मुंबई: Gold Silver Price Latest : गेले काही दिवस सोन्याच्या भावात मोठी वाढ पहायला मिळत होती. २०२४ मध्ये सोन्याचे चढे दर पहायला मिळाले असतानाच आता सोन्याचे भाव विक्रमी किंमतीवर पोहोचले आहेत. 'गुडरिटर्न्स 'संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २२ कॅरेट प्रकारात प्रति ग्रॅम सोने १५ रूपयांनी वाढत ६०२५ रूपये प्रति ग्रॅम दरावर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोने दरात १७ रूपयांनी वाढ होत ६५५३ रूपये प्रति ग्रॅम झाले आहे.
तसेच आता लग्न समारंभ यांची वाढती मागणी असताना या तिमाहीत याहून अधिक दरवाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेन फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपात होण्याच्या संभाव्यतेने व रूपयाची डॉलरच्या तुलनेत पण वाढल्याने सोन्याचा दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतातील महत्वाच्या शहरात ही मोठी दरवाढ झाली आहे.
मुंबईत सोन्याचे दर २२ कॅरेट,६०२५० रूपये प्रति १ तोळा (१० ग्रॅम) व २४ कॅरेट, ६५७३० रूपये प्रति १ तोळा इतकी सराफा बाजारात नोंदवली गेली आहे. गेले १० दिवसांत सोन्याच्या किंमतीत १५० ते १७० अंशाने वाढ झाली. चांदीच्या किंमतीतही आज प्रति ग्रॅमवर ०.५० अंशाने वाढ झालेली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत तब्बल ५०० रूपयांनी वाढत ७५५०० प्रति किलो रूपयांपर्यंत पोहोचली आहे.
२०२३ मध्ये सोन्याचे भाव सरासरी १६ टक्क्याने वाढले होते. ती वाढ आता कायम राहत चांदीच्या भावात या वर्षी दरवाढ कायम राहिली आहे.