बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित! मंदिरात घुसून महिला पुजारीची हत्या!
05-Mar-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशमधील गोपालगंज जिल्ह्यातील मालीबाटा विश्वबंधु सेवाश्रम येथे एका महिला हिंदू पुजाऱ्याचा मृतदेह सापडला. ही घटना रविवारी, दि. ३ मार्च २०२४ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव हशिलता बिस्वास असे आहे. महिलेचे वय ७० वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दि. २ मार्चला रात्री त्या मंदिरात झोपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोक मंदिरात गेले तेव्हा त्यांना दरवाजे उघडे दिसले. नंतर त्यांना हशिलता बिस्वास यांचा मृतदेह सापडला. महिलेचे तोंड आणि हात दोरीने बांधले होते.
मालीबाटा विश्वबंधू सेवाश्रमाचे कपाट व दानपेटी फोडून लुटल्याचे आढळून आले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात हशिलता बिस्वास यांची चोरीदरम्यान हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित महिला गेल्या वर्षभरापासून मालीबाटा विश्वबंधू सेवाश्रमात पूजा करत होती. त्याआधी, त्यांचे दिवंगत पती दिपिन बिस्वास १० वर्षे धार्मिक कार्ये सांभाळत होते.
सदर पोलिस स्टेशनचे ओसी मोहम्मद अनिचूर रहमान यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आम्ही मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ते पुढे म्हणाले की, “या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
गोपालगंजमधील मालीबाटा विश्वबंधु सेवाश्रमच्या सरचिटणीसांनी हशिलता बिस्वास यांच्या हत्येचा निषेध केला आणि सांगितले, “या आश्रमात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावेळीही चोरटे चोरी करण्यासाठी घुसले असावेत. बांगलादेशात या वर्षी दि. ७ जानेवारी रोजी केंद्रीय निवडणुका झाल्यापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदाय भीतीच्या वातावरणात जगत आहे.