मुंबई (विशेष प्रतिनिधी): वसई किल्ल्याच्या परिसरात शुक्रवार दि. २९ मार्च रोजी एका दुचाकीने बिबट्याला (vasai leopard) जोरदार धडक दिली. रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात असून या अपघातामध्ये बिबट्या (vasai leopard) जखमी झाला असल्याचे सांगितले गेले आहे. वनविभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेमार्फत या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
वसई किल्ला प्रवेशद्वार ते जेट्टीला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत असलेल्या बिबट्याला (vasai leopard) एका दुचाकी स्वाराने धडक दिली. अपघातानंतर दुचाकी स्वाराने तेथुन पळ काढला असून त्याच्या गाडीची तुटलेली नंबरप्लेट घटनास्थळावरून वनविभागाच्या हाती लागली आहे.
अपघात ग्रस्त बिबट्याही (vasai leopard) त्या स्थळावरुन निघून गेल्यामुळे त्याचे रेस्क्यू किंवा उपचार अद्याप केलेले नाही. तर, रेस्क्यूसाठी या बिबट्याचा शोध वनविभागामार्फत घेण्यात येत आहे. वसई किल्ला परिसरात व्हिडीओ कॅमेरे लावून या बिबट्याचे निरिक्षण करण्याचा वनविभागाचा विचार असून त्यानंतरच बिबट्याच्या उपचारांबाबतचे निर्णय घेतले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. वसई आणि किल्ल्याच्या परिसरातील स्थानिक लोकांसाठी वनविभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या (WWA) माध्यमातुन जनजागृती करण्यात येत आहे.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.