'द गार्डियन' हिंदू कार्यकर्ता काजल हिंदुस्तानीच्या मुलाखतीसाठी का आसुसलेले?, हिंदूंविरोधी षडयंत्र!

    26-Mar-2024
Total Views |
the guardian interview kajal hindustani

 

नवी दिल्ली :      विदेशी वृत्तपत्र 'द गार्डियन' हिंदू कार्यकर्ता काजल हिंदूस्तानीची मुलाखत घेण्यासाठी विचारणा करत आहे. विशेष बाब म्हणजे हिंदुत्वाची बदनामी, भारतविरोधी प्रचार करणाऱ्या 'द गार्डियन' वृत्तपत्राने काजल यांच्या मुलाखत घेण्याची जबाबदारी ज्यांना मिळाली आहे ते सर्व हिंदूविरोधी पत्रकारितेसाठी कुख्यात असेच असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, 'द गार्डियन' वृत्तपत्र हिंदू कार्यकर्त्या काजल हिंदुस्तानीची मुलाखत घेण्याच्या विचारात होते. यासंदर्भात नुकतीच काजलच्या ट्विटद्वारे ही माहिती समोर आली आहे. विचित्र गोष्ट म्हणजे ही मुलाखत घेण्याची जबाबदारी हिंदूविरोधी पत्रकारितेसाठी कुख्यात असलेल्या तीन पत्रकारांवर सोपवण्यात आली होती, ज्यांना मार्चपूर्वी म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याचा निपटारा करायचा होता, अशीही माहिती मिळत आहे.


हे वाचलंत का? -   जयराम रमेश यांच्या टीकेला केंद्रीय मंत्र्यांचे जोरदार प्रत्युत्तर, निर्भया निधीचा उल्लेख करत केली पोलखोल!



काजल हिंदुस्तानीने 'द गार्डियन'च्या दक्षिण आशियाई प्रतिनिधी हॅना एलिस-पीटरसन यांच्या ट्विटला उत्तर देताना या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “प्रिय बहिण. सर्वप्रथम, माझ्याकडे त्या गप्पा आहेत ज्यात मला सांगण्यात आले होते की तुमची टीम यूकेमधून उड्डाण करत आहे. तू फक्त भारतात आहेस हे मला सांगण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले.


काजल आपल्या 'X' पोस्टमध्ये लिहितात की, दुसरे म्हणजे, तुम्ही माझी मुलाखत मार्चपर्यंतच घ्यायला का उत्सुक आहात? तिसरे, मी अजूनही मुलाखतीसाठी तयार नाही. पण तुमच्या घाईमुळे मला वाटले की काहीतरी चुकीचे आहे आणि आता हिंदूंवर तुमचे कव्हरेज पाहून मला समजले की असे का?, असेही काजल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.