केरळमध्ये स्वतःच्या २ वर्षांच्या मुलीला फैजकडून मारहाण, रक्तस्त्रावाने ओढवला मृत्यु!

    26-Mar-2024
Total Views |
mohammad-faiz-arrested-after-allegations


नवी दिल्ली :    नसरीन या २ वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना केरळमधील मलप्पुरम येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत तिच्या डोक्यात रक्ताची गुठळी तयार झाली, त्यानंतर तिचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, सदर प्रकरणी मुलीचे वडील फैज याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, नसरीनच्या मृत्यूनंतर तिचे वडील मोहम्मद फैज फरार झाले. या घटनेबाबत पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची एफआयआर नोंदवली होती. परंतु, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळून आले आहे की, मृत्यूपूर्वी नसरीनला खूप मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे तिच्या डोक्यात रक्ताची गुठळी तयार झाली यातच दुर्दैवाने, तिचा मृत्यू झाला. तसेच, या मारहाणीत नसरीनचे स्नायू तुटले, डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा यामुळे रक्तस्त्रावदेखील झाला.


हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळा : १७० गॅजेट्ससह केजरीवाल यांनी वापरलेला मोबाईल फोन गायब!


प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिच्या चेहऱ्यावर आणि छातीवर खोल जखमांच्या खुणा असल्याचे म्हटले आहे. डोक्यालाही खोल जखम झाली असून स्नायूही तुटले. मुलीच्या हातावर रक्त आणि सिगारेटच्या जळण्याच्या खुणा असल्याचे अहवालातून समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकावा भागात राहणारे मोहम्मद फैज याने दि. २४ मार्च २०२४ त्यांची दोन वर्षांची मुलगी नसरीनला रुग्णालयात दाखल केले होते. फैजने येथील डॉक्टरांना सांगितले की, त्यांच्या मुलीने काहीतरी खाल्ले आहे ते तिच्या घशात अडकले असून त्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली.

नसरीनचा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्टमॉर्टममध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात नसरीनच्या चेहऱ्यावर आणि छातीवर खोल जखमा झाल्याचं म्हटलं आहे. डोक्यालाही खोल जखम झाली होती. अनेकांचे स्नायूही तुटले. नसरीनच्या हातावर रक्त आणि सिगारेटच्या जळण्याच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले.