“ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा”, स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया
26-Mar-2024
Total Views |
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या खास शैलीत स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटात सावरकरांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचा संघर्ष भव्य पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले असून सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा देखील त्यानेच साकारली आहे. देशभरातून या चरित्रपटाला उत्तम प्रतिसाद येत असून मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची या (Swatantryaveer Savarkar) चित्रपटासाठीची पोस्ट सध्या तुफान वायरल होत आहे. यात त्यांनी ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा असे लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी ">प्रवीण तरडे यांनी पोस्ट करत लिहिले आहे की,
॥ धर्मो रक्षिती रक्षित:॥
अफाट अचाट आयुष्य जगलेल्या
जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या
महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं
ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा, अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी करत सोबत चित्रपटाचे एक पोस्टरही शेअर केले आहे.
तसेच, या पुर्वी अभिनेते अजय पुरकर यांनी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून देशभरातील लोकांनी आपल्या मुलांसह हा चित्रपट पाहावा असा आग्रह करणारा व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान, २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.