“तुम्ही बाहेर निघा…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान अंकिता पापाराझींवर भडकली
22-Mar-2024
Total Views |
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट आज २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या आदल्यादिवशी म्हणजेच गुरुवारी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) चित्रपटाचे कलाकारांसाठी स्पेशल स्क्रिनिंग (Swatantryaveer Savarkar) आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंकिता पापाराझींवर चिडलेली दिसली.
दरम्यान, हिंदी बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर ">अंकिता लोखंडे हिचा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या स्पेशल स्क्रिनिंगला ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनाही आमंत्रण होतं. यावेळी अभिषेक कुमार आणि फिरोजा (खानजादी) यांच्याबरोबर अंकिता लोखंडेला पाहिले असता पापाराझी त्यांच्या मागे मागे गेले. काही जण म्हणाले, “चला चला आत जाऊ.” हे ऐकून अंकिताने त्यांना अडवलं आणि म्हणाली, “तुम्ही बाहेर निघा, आत चित्रपट सुरू आहे आणि तुम्ही असे आत येताय, हे तुम्ही खूप चुकीचं करताय; थोडं तरी भान राखा.”
दरम्यान, अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंकिता पापाराझींवर भडकताना दिसली. तिच्या या व्हिडिओवर काहींनी तिला जरी ट्रोल केले असले तरी काही जणांनी “अंकिता बरोबर बोलतेय”, “अंकिता तिच्या जागेवर योग्य आहे”, अंकिताची बाजू मांडत तिची बाजू घेतली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अंकिताने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीप हुड्डा याने केली आहे.