ब्लू डार्टतर्फे एमएसएमईज आणि मोठ्या उद्योजकांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा

    22-Mar-2024
Total Views |
bluedart
 
मुंबई: ब्लू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमियर एक्सप्रेस एयर आणि इंटिग्रेटेड वाहतूक व वितरण कंपनीने युनिफाइड शिपिंग एपीआय सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. हा प्लॅटफॉर्म भारतभरातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमईज) तसेच मोठ्या उद्योगांना त्यांच्या लॉजिस्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे.
 
हे नाविन्यपूर्ण टुल लघु,मध्यम आणि मोठ्या कंपन्यांना डिजिटायझेशनद्वारे फर्स्ट माइल पाठवताना येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आव्हानांवर मात करण्यासाठी मदत करणारे असून त्यात कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.सर्व उद्योगक्षेत्रांतील कामकाज सुलभ करून विकासाला चालना देत ब्लू डार्टने व्यवसायांच्या शिपमेंट हाताळण्याच्या पद्धतीत कार्यकारी बदल घडवण्याचे ध्येय ठेवले आहे.
 
ब्लू डार्टद्वारे eShipz.com तर्फे उपलब्ध करून दिला जाणारा अत्याधुनिक सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म सद्य लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. या एकत्रीकरणामुळे आधुनिक डिस्पॅच टुल्स उपलब्ध होतील व पर्यायाने शिपर्सच्या विक्री प्लॅटफॉर्म, मार्केटप्लेसेस ऑर्डर व्यवस्थापन यंत्रणा, वेयरहाउस व्यवस्थापन यंत्रणा आणि उद्योग स्त्रोत नियोजन यंत्रणेतील कनेक्टिव्हिटी सोपी होईल.
 
या उत्पादनाविषयी ब्लू डार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर बॅलफर मैनूअल म्हणाले, ‘या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही एमएसएमईज तसेच मोठ्या उद्योगांच्या क्षमता वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचप्रमाणे त्यांना पुरवठा साखळी प्रक्रियेचा पूर्ण वापर करण्यासाठी व त्यांच्या उद्योगात पुढे जाण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. एमएसएमईजच्या विकासाला भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर पाठिंबा देण्यासाठी व त्यांना यश मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.’
 
या भागिदारीविषयी eShipz.com चे को-फाउंडर आणि सीएमओ शिवदीप महाडी म्हणाले,‘ब्लू डार्टसह केलेली भागिदारी तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसायांना सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे.’
 
विस्तृत व्याप्ती हे ब्लू डार्टच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक असून ते देशातील 56,000 पेक्षा जास्त ठिकाणी पोहोचतात, तर डीएचएल समूह जगभरातील 220 देश-प्रदेशात कार्यरत आहे.