मुंबई: आजपासून क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस आयपीओ बाजारात नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.अपेक्षेप्रमाणे अधिक प्रतिसाद या आयपीओला मिळाला असून शेअर बाजारात १० टक्के प्रिमियम दराने हा समभाग (शेअर) नोंदणीकृत झाला आहे. सुरूवातीला ७८५ रूपये प्रति समभाग या भावाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत झाला आहे. कंपनीचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ १४ ते १८ मार्च या कालावधीत आला होता.
फ्रेश इश्यू व ऑफर फॉर सेल मार्फत इंटिग्रेटेड सर्विसेसने ४.२ दशलक्ष समभाग बाजारात आणले होते.एकूण शेअरचे मूल्यांकन ३०० कोटींहून अधिक होते. किरकोळ व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या मागणीमुळे ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे समभाग १० ते ११ टक्क्यांच्या प्रिमियम दराने विकले गेले आहेत.
बीएससीच्या आकडेवारीनुसार हा आयपीओ १३.२१ वेळा सबस्क्राईब केला गेला आहे तर विना संस्थापक गुंतवणूकदारांकडून या समभागांचा ४३.९१ टक्के वाटा विक्रीसाठी गेला आहे.किरकोळ गुंतवणूकदारांकडून केवळ ३.३२ वेळा या आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Buyers) कडून ७.३३ वेळा सबस्क्रिप्शन खरेदी केले गेले आहे.
क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस ही मॅनेजमेंट सोलूशन कंपनी असून हाऊसकिपिंग, सॅनिटेशन, कॅटरिंग अशा विविध प्रकारच्या सुविधा ग्राहकांना पुरवते. कंपनीकडून ६८० ते ७१५ रूपयांचा प्राईज बँड प्रति समभाग ठेवला गेला होता.