
मुंबई: आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नवीन गुंतवणूकदार सदस्यतेची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. २९ फेब्रुवारीला एनएससीमध्ये सदस्यांची संख्या ९ कोटी पार झाली आहे. आजपर्यंत एकूण १६.९ कोटी ग्राहकांची कोड नोंदणी दाखल झाली आहे. आता ग्राहक एकाहून अधिक कोडची नोंदणी स्टॉक एक्सचेंजबरोबर करू शकतील.
गेल्या काही वर्षांत एनएससीवर 'युनिक इन्व्हेसमेंट रजिस्ट्रेशन ' (नोंदणीची) संख्या वाढवली असल्याची आकडेवारीत दिसून येते. गेल्या ९ महिन्यात ६ ते ७ कोटी नोंदणीकृत सदस्यावरून पुढील १ कोटी सदस्यवाढ ८ महिन्यात झाल्याचे माहितीपत्रकात म्हटले गेले आहे. ८ ते ९ कोटीवरून १० कोटीपर्यंत सदस्यवाढ पाच महिन्यात पत्रकात दर्शविले आहे. ऑक्टोबर २०२३ मधील ४७००० वरून जानेवारी २०२४ पर्यंत ही वाढ ७८००० सदस्यांवर पोहोचली आहे. गेल्या ५ वर्षातील सदस्यवाढ ही तिपटीने वाढली आहे. आर्थिक नियोजन, विकास, आर्थिक जागृकता आर्थिक साक्षरता अशा विविध मुद्यांमुळे ही डिजिटल सदस्य वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २४ सुरूवातीला विशेषतः २९ फेब्रुवारी २४ पर्यंत निफ्टी ५० निदर्शकांतून २७ टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. निफ्टी ५०० निर्देशांकामधून गुंतवणूकदारांना सारख्या काळात जवळपास ३८ टक्क्यांनी परतावा मिळाला आहे. फेब्रुवारी २०२४ आधीच्या मागील पाच वर्षांतील हा परतावा निफ्टी ५० व निफ्टी ५०० साठी अनुक्रमे १५.३ टक्के व १७.५ टक्के राहिली आहे.
ऑक्टोबर २०२३ पासून झालेल्या एकूण नोंदणीतील ४१ टक्के वाढ उत्तर भारतात झाली असून त्या खालोखाल पश्चिम भारत (२८ टक्के), दक्षिण भारत (१७ टक्के), पूर्व भारत (१३ टक्के) इतकी झाली आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांमधून झालेल्या नोंदणीत सर्वाधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्रातून १.६ कोटी व उत्तर प्रदेशातून ९७ लाख सदस्य नोंदणीत वाढ झाली. त्यानंतर गुजरात (८१ लाख ) पर्यंत नोंदणी पोहोचली आहे.
मागील ५ महिन्यात ४५ टक्के नोंदणी महत्वाच्या १०० जिल्ह्यव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सदस्य नोंदणीत वाढ झालेली असताना एकूण एसआयपी खात्यात (ऑक्टोबर २३ ते जानेवारी २४ मध्ये) मासिक एसआयपी चे व्यवहार १७६०० कोटींच्या घरात झाले आहेत जे मागील ६ महिन्यात १५११५ कोटी रुपये इतके होते.
सदस्य नोंदणीत झालेल्या वाढीवर प्रतिक्रिया देताना, एनएससीचे चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीराम कृष्णन म्हणाले, “अद्ययावत १ कोटी नवीन गुंतवणूकदार पाच महिन्यांच्या कमी कालावधीत एक्सचेंजमध्ये दाखल झाले आहेत हे पाहणे उत्साहवर्धक ठरले आहे .इक्विटी, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), REITs, InvITs, सरकारी बाँड्स, कॉर्पोरेट बाँड्स इत्यादीसारख्या विविध एक्सचेंज ट्रेडेड आर्थिक साधनांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढवणे हे काही प्रमुख चालकांमुळे कारणीभूत ठरले जाऊ शकते जसे की गेल्या काही वर्षांमध्ये KYC प्रक्रिया सुलभ करणे, गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमांद्वारे सर्व भागधारकांनी दिलेली आर्थिक साक्षरता आणि दीर्घकालीन सकारात्मक बाजार भावना कायम ठेवली.