नोकरीच्या शोधात आहात?, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच, जाणून घ्या तपशील

    02-Mar-2024
Total Views |
Job Vacancy

मुंबई : 
'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. स्टील अथॉरिटीकडून रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड'कडून पदभरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पदभरतीकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख जाणून घेऊयात.
पदाचे नाव -

ऑपरेटर-कम-टेक्निशियन(ट्रेनी)


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतूऩ अभियांत्रिकी विषयातील पदवी.


वयोमर्यादा -

१८ ते २८ वर्षे


वेतनमान -

२६,६०० - ३८,९२० रुपये.


अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५०० रुपये
राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता २०० रुपये


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १८ मार्च २०२४ असेल.

 
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा
 
भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा