कामगारांचा कामावर येण्यास नकार! रागाच्या भरात ठेकेदार 'मोहम्मद रफिक'ने लावली घरांना आग

    19-Mar-2024
Total Views |
 Contractor labour
 
गांधीनगर : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या जाळल्याची घटना समोर आली आहे. बाधित १२ झोपड्यांना आग लागल्याचा आरोप कंत्राटदार मोहम्मद रफिक याच्यावर आहे. त्यांच्याकडे थकबाकीची मागणी करणाऱ्या कामगारांना रफिकला जिवंत जाळायचे होते, असा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून रफिकला अटक केली आहे. ही घटना रविवारी, दि. १७ मार्च २०२४ घडली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कच्छ जिल्ह्यातील अंजार भागात घडली. येथील खत्री चौकाजवळ मोची बाजार असून तेथे अनेक रोजंदारी मजूर आपल्या कुटुंबासह झोपडपट्टीत राहतात. या सर्वांचा ठेकेदार मोहम्मद रफिक आहे. मजुरांचा पैसा बुडवल्याचा आरोप रफीकवर आहे. रफीक कामासाठी जास्त पैसे घ्यायचा. मात्र, तो मजुरांना दिवसाला केवळ १०० रुपये द्यायचा आणि बाकीची रक्कम स्वतःकडे ठेवायचा. याशिवाय रफिकने अनेक मजुरांची मजुरीही दिली नाही.
 
 
कामगारांना पैसे मिळत नसल्याने रफिकसोबत त्यांचा वाद सुरू झाला. रफिकने पैसे न दिल्याने शनिवारी, दि. १६ मार्च २०२४ कामगारांनी आतापासून त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. कामगारांनी कामावर येण्यास नकार दिल्याने रफिक चांगलाच संतापला. त्यानंतर त्यांनी मजुरांना जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. रविवारी सकाळी अचानक कामगारांच्या झोपडपट्टीला आग लागली. काही वेळातच १२ झोपडपट्ट्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. घटना घडली त्यावेळी बहुतांश कामगार झोपडीत झोपले होते.
 
आगीमुळे मोची बाजारात गोंधळ उडाला. पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाची बाब म्हणजे या आगीच्या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडले नाही. मात्र, कामगारांची घरे जळून खाक झाली. आग विझवल्यानंतर गंगाराम यादव यांच्यासह अन्य काही पीडितांनी ठेकेदार रफिकविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मोहम्मद रफिक याने आधी कामगारांच्या झोपड्यांवर ज्वलनशील पदार्थ फेकले आणि नंतर त्यांना आग लावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 
 
घटनेनंतर रफिक अटक टाळण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याला रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. रफिकवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचे कलम लावण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.