'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चरित्रपटातून वीर सावरकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून सावरकरांच्या भूमिके रणदीप हुड्डा दिसणार आहे.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर ( Swatantryaveer Savarkar) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य अभिनेता रणदीप हुड्डा याने उचलले आहे. लवकरच हा ( Swatantryaveer Savarkar) चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ( Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणदीप म्हणाला की, “सावरकर हा चित्रपट मी माझं घर दार विकून केला आहे”, असे तो म्हणाला.
काय म्हणाला रणदीप हुड्डा?
नुकतीच रणदीपने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपट आणि तो करत असताना कोणत्या अडचणींचा सामना केला होता यावर भाष्य केले. रणदीप म्हणाला, “कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहना. हा चित्रपट करण्यामागचे वास्तव मला माहित आहे. हा चित्रपट मी वीर सावरकरांवर जो अन्याय झाला होता तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचे माध्यम निवडून बनवला आहे. यामध्ये माझी कुणीही मदत केली नाही. मी माझं घर दार विकून हा चित्रपट केला आहे”. त्यामुळे नक्कीच या चित्रपटातून प्रेक्षकांना आणखी एक खरा चरित्रपट पाहायला मिळेल यात शंका नाही.
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी निर्मिती केली असून स्वत: रणदीप हुड्डा याने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला होता, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारताना त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा मी चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारताना अनुभवली. देशासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो जगासमोर आला पाहिजे याच अट्टहासामुळे मी या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील करण्याचा निर्णय घेतला”.