'स्वातंत्र्यवीर सावरकर'या चित्रपटाबद्दल विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आपले मंत मांडले आहे.
मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चरित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर (Swatantryaveer Savarkar) आता सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रणजीत सावरकर?
ANI ला दिलेल्या मुलाखतीत रणजीत सावरकर म्हणाले की, "रणदीप हुड्डा यांच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली आहे. त्यांनी खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे, त्यांनी ३० किलो वजन देखील कमी केले आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही पण हा चित्रपट चांगला असेल याची नक्कीच मला खात्री आहे. चित्रपट हे एक माध्यम आहे ज्याद्वारे इतिहास नव्या पिढीला दिला जाऊ शकतो. मला आशा आहे की सावरकरांवर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी चित्रपट बनतील."
नुकतीच रणदीपने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपट आणि तो करत असताना कोणत्या अडचणींचा सामना केला होता यावर भाष्य केले. रणदीप म्हणाला, “कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है केहना. हा चित्रपट करण्यामागचे वास्तव मला माहित आहे. हा चित्रपट मी वीर सावरकरांवर जो अन्याय झाला होता तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचे माध्यम निवडून बनवला आहे. यामध्ये माझी कुणीही मदत केली नाही. मी माझं घर दार विकून हा चित्रपट केला आहे”. त्यामुळे नक्कीच या चित्रपटातून प्रेक्षकांना आणखी एक खरा चरित्रपट पाहायला मिळेल यात शंका नाही.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी निर्मिती केली असून स्वत: रणदीप हुड्डा याने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.