नाशकातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचा (Transit Treatment Centre) लवकरच शुभारंभ. वन्यप्राण्यांवर उपचार करणारे अत्याधुनिक केंद्राचे (Transit Treatment Centre) काम पुर्ण...
मुंबई (विशेष प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (Transit Treatment Centre) नाशिकमध्ये येत्या एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलेच अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त वन्यप्राण्यांचे उपचार केंद्र (Transit Treatment Centre) असून त्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. नाशिक वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करत हे केंद्र (Transit Treatment Centre) उभारण्यात येत आहे.
नाशिकमधील जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी केंद्र (Transit Treatment Centre) असावे अशी मागणी सातत्याने वन्यजीव प्रेमींकडून केली जात होती. नाशिकच्या म्हसरूळ येथील वनविभागाच्या जागेमध्ये हे उपचार केंद्र उभारण्यात आले असून यामध्ये पक्ष्यांसाठी एव्हियरीज, फ्लाईट एरिया, लहान मोठे पिंजरे, स्वतंत्र ऑपरेशन थिएटर, स्वतंत्र आयसीयू, तसेच बिबट्यांसाठी स्वतंत्र पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (Transit Treatment Centre) ४५ प्राणी ठेवता येतील अशी व्यवस्था करण्यात आलीय. अनेकदा वन्यप्राणी अपघातात किंवा विहीरीत पडून जखमी झाल्याच्या घटना घडतात. या जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा मुक्त अधिवासात सोडण्यात येते. या प्राण्यांवर त्वरित आणि योग्य उपचार करता यावे यासाठी हे उपचार केंद्र (Transit Treatment Centre) उभारण्यात येत आहे.
“बिबटे किंवा इतर वन्यप्राण्यांवर उपचार करायचे झाल्यास यापुर्वी त्यांना मुंबई किंवा पुण्याच्या उपचार केंद्रांमध्ये पाठवावे लागत असे. यामध्ये प्राण्यांना प्रवास करून ही न्यावे लागत होते. अत्याधुनिक सोयींनीयुक्त ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारल्यामुळे आता वन्यप्राण्यांवर इथेच उपचार करता येणार आहेत.”