नंदूरबार : उबाठा गटाला एकामागून एक धक्के बसत असून आता आणखी एक नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदूरबार येथील उबाठा गटाचे आमदार आमश्या पाडवी हे शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविवारी आमश्या पाडवी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते उबाठा गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमदार आहेत. त्यांच्या जाण्याने उबाठाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.
आमशा पाडवींना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रचंड मेहनत घेतली असून ते ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. आमशा पाडवींसोबत अनेक कार्यकर्तेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उबाठा गटाला मोठं भगदाड पडणार आहे.
शनिवारी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूका पार पडतील. तसेच महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूका होणार आहेत. दरम्यान, निवडणूकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने उबाठा गटाला धक्का बसला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.