नवी दिल्ली : एंड्रोट आणि कल्पेनी या बेटांसाठी पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किमतीत प्रति लिटर १५.३ रुपये आणि लक्षद्वीप बेटांमधील कावारत्ती आणि मिनिकॉयसाठी ५.२ रुपयांनी प्रतिलीटर कपात करण्यात आली आहे. ही कपात दि. १६ मार्चपासून लागू होणार आहे. लक्षद्वीपच्या सर्व बेटांवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता पेट्रोलसाठी १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी ९५.७१ रुपये प्रति लिटर असेल.
लक्षद्वीपमध्ये, IOCL चार बेटांना कावरत्ती, मिनिकॉय, एंड्रोट आणि कल्पेनी यांना पेट्रोल आणि डिझेल पुरवत आहे. IOCL चे कावरत्ती आणि मिनिकॉय येथे तेल साठे आहेत. तसेच या तेलसाठ्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केरळमधील कोची येथील IOCL तेल साठ्यातून केला जातो.
या निर्णयामुळे, पेट्रोल आणि डिझेलचा आरएसपी अंदाजे ६.९० रुपये/लिटर (१०% व्हॅटसह ७.६० रुपये/लिटर) ने कमी होईल, ज्यामुळे ग्राहकांना फायदा होईल. सर्व बेटांवर किंमत समान करण्यासाठी, ७.६० रुपये प्रति लिटर उपलब्ध मार्जिन चार बेटांमध्ये त्यांच्या विक्रीच्या प्रमाणात वितरीत केले गेले आहे.कावरत्ती आणि मिनिकॉयमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा आरएसपी सुमारे ५.२ रुपये/लिटरने कमी होण्याची शक्यता आहे. तर, एंड्रोट आणि कल्पेनीमध्ये, आरएसपी सुमारे १५.३ रुपये/लिटरने कमी होईल.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केली आहे. यापूर्वी राजस्थानमधील भजनलाल सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट दोन टक्क्यांनी कमी करून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल १.४० ते ५.३० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल १.३४ ते ४.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.