लग्नात अडथळा आणला! रागाच्या भरात 'झुबिन जोस'ने केली 'चर्च'वर दगडफेक

    15-Mar-2024
Total Views |
 KERLA CHURCH
 
कोची : केरळमधील इडुक्की येथे आठ चर्चवर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक चर्चवर दगडफेक करून त्यांचे नुकसान केले. या व्यक्तीने चर्चवर दगडफेक का केली? याच चौकशी पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्की येथील पुलियानमाला येथील रहिवासी झुबिन जोस हा चर्चच्या धोरणांवर नाराज होता.
 
चर्चवरील आपला राग काढण्यासाठी त्याने हल्ला करण्याचे ठरवले होते. त्याच्या रागाचे कारण म्हणजे ही मंडळी त्याच्या लग्नात नात्याला येण्यापासून रोखत होती. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की झुबिन जोसचे घटस्फोट झाले असले तरी त्याचे आधी लग्न झाले होते. तो आता पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न करत होता पण चर्चची मंडळी त्याच्या मार्गात अडथळे आणत होती. यामुळे तो चर्चवर रागावला होता.
 
 
चर्चने लग्न करू न दिल्याचा बदला घेण्यासाठी झुबिन जोसने मंगळवारी, दि. १२ मार्च २०२४ चर्चवर हल्ला करण्याची योजना आखली होती. यानंतर तो कट्टाप्पाण्णा आणि चेट्टुकुझीसह जवळपासच्या ठिकाणी बांधलेल्या चर्चवर हल्ला आणि दगडफेक करायला निघाला. त्याने वाटेत अनेक चर्चवर दगडफेक केली. चर्चवर हल्ला करण्यासाठी तो त्याच्या मोटरसायकलवरून २० किलोमीटरचा प्रवास केला. या काळात त्याने एकूण आठ चर्चवर हल्ला केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
 
चर्चमधील काचांवर झुबिनने दगडफेक केली. चर्चवरील हल्ल्यांनंतर केरळ पोलीस कारवाई करत त्याचा शोध सुरू केला. या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून पोलिसांनी झुबिनची ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने लग्न थांबवल्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले. यापूर्वी हल्ल्यानंतर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे काम करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सत्य वेगळेच निघाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.