आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत अखेर १०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
मुंबई : जम्मू- काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० (Article 370) चा स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास 'आर्टिकल ३७०' (Article 370) या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी अडीच तासात संपुर्ण इतिहास उत्कृष्ट मांडला असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या (Article 370) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने जगभरात १००.०६ कोटी आणि देशात ७३.५६ कोटी कमवाले आहे. अभिनेत्री यामी गौतम हिने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, “ही लोकांची ताकद आणि प्रेम आहे’.
आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाची निर्मिती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत यामी गौतमसोबत, अभिनेत्री प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर दिसत आहेत.
पंतप्रधानांनीही केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी देखील जम्मूमध्ये ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचे कौतुक केले होते जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी ऐकलंय की या आठवड्यात ‘आर्टिकल ३७०’ वर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कसा आहे याबद्दल मला माहीत नाही. पण मी या चित्रपटाबद्दल नुकतंच ऐकलंय. ही चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.”
यामी गौतमने व्यक्त केला आनंद
“पंतप्रधान मोदींना आमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल बोलताना ऐकणं हा मोठा सन्मान आहे. माझी टीम आणि मला आशा आहे की ही अविश्वसनीय कथा पडद्यावर आणण्यात आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू,” असे यामीने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ शेअर करत लिहिले होते.