सत्तेत असताना तुम्ही मोहम्मद अली रोडवर...; शेलारांचा राऊतांना टोला

    14-Mar-2024
Total Views |

Raut & Thackeray


मुंबई :
सत्तेत असताना तुम्ही मोहम्मद अली रोडवरची बिर्याणी खाण्यात मश्गुल होतात, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला आहे. गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
आशिष शेलार म्हणाले की, "रोज सकाळी बोलघेवडे पत्रकार पोपटलाल बोलतात. मुंबई कोणाची याचे मोठे गमजे मारतात. पण मुंबईचं मराठीपण कोणी टिकवलं? असा सवाल त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, "आज डोंगरी, माझगाव, काळाचौकी, लालबाग, नाना जगन्नाथ शंकरशेठ, पार्श्वनाथजी या नावांनी मुंबईची खरी ओळख देणारा निर्णय महायुती सरकारने केला आहे.
हे वाचलंत का? - महायुतीतील ८० टक्के जागावाटप पूर्ण! उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
 
"तुम्ही राज्यात सत्तेत असताना मोहम्मद अली रोडवरची बिर्याणी खाण्यात मश्गुल होतात. मुंबईतील मराठी माणसाची सेवा महायुतीच करत आहे. त्यामुळे मुंबईकर आम्हालाच आशीर्वाद देतील आणि सेवक म्हणून आम्हीच त्यांचे काम करत राहू," असेही ते म्हणाले आहेत.
 

दरम्यान, बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे गिरगांव, कॉटन ग्रिनचे काळाचौकी, डॉकयार्डचे माझगांव, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे तिर्थकर पार्श्वनाथ तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव नाना जगन्नाथ शंकर शेट असं केलं जाणार आहे.