कोल इंडियामध्ये भरती सुरू, मिळेल २ लाखांपर्यंत वेतन, तपशील जाणून घ्या

    13-Mar-2024
Total Views |
Coal India Recruitment


 
मुंबई : 'ईस्टर्न कोल लिमिटेड' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'ईस्टर्न कोल लिमिटेड'मध्ये काम करणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. 'ईस्टर्न कोल लिमिटेड'मधील रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे.

या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकृतीस दि. १२ मार्च पासून अर्ज स्वीकृतीस सुरूवात झाली आहे. 'ईस्टर्न कोल लिमिटेड'च्या माध्यमातून 'वैद्यकीय कार्यकारी' विभागातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीकरिता आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याकरिता अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत.
 
पदाचे नाव -


वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ (१० जागा )
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (२७ जागा )
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंतवैद्य) (०१ जागा )
पीडब्ल्यूडी उमेदवारांकरिता ( ०३ जागा )


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवीधर
सविस्तर तपशीलाकरिता जाहिरात पाहावी


वयोमर्यादा -

वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ पदाकरिता ४२ वर्षे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ३५ वर्षे
 
 
वेतनश्रेणी -

वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ - ७० हजार - २ लाख रुपये
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (२७ जागा ) - ६० हजार - १,८०,००० रुपये
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंतवैद्य) (०१ जागा ) ६० हजार - १,८०,००० रुपये


अधिसूचना सविस्तर वाचण्यासाठी http://www.easterncoal.nic.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ११ एप्रिल २०२४ असेल.


भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा