‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला थेट न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर

    01-Mar-2024
Total Views |
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ या चरित्रपटाचा व्हिडिओ न्यूयॉर्कच्या 'टाईम्स स्क्वेअर' वर झळकला आहे.
 

veer savarkar 
 
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यानेच या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच चित्रपटाबद्दल आणखी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचा व्हिडिओ न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे.
 
 आपण हे वाचलंत का? -  १९३७ नंतरचे वीर सावरकर...
 
वीर सावरकर यांच्या जीवनाबद्दल, देशप्रेम, त्याग या सर्वांचा उलगडा लोकांसमोर व्हावा हाच अट्टहास रणदीपचा हा चित्रपट करण्यामागे होता असे त्याने सांगितले होते. तसेच, काही दिवसांपूर्वीच त्याने वीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त अंदमानमधील सेल्युलर जेलला देखील भेट दिली होती. या जेलमधील वीर सावरकरांच्या खोलीतही त्याने काही वेळ घालवत म्हणाला होता की, मी २० मिनिटं पण या जेलमध्ये राहू शकलो नाही जिथे सावरकरांनी ५० वर्ष तुरुंगवास भोगला होता, खरंच मनाला वेदना देणारी ही आठवण आहे, असेही त्याने म्हटले होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा सोबत अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पहिली वेब सीरीज येणार भेटीला
 
एकीकडे रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पहिली हिंदी वेब सीरीज देखील प्रदर्शित होणार आहे. 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' असे या वेब सीरीजचे नाव असून याचे दिग्दर्शन आणि लेखन योगश सोमण यांनी केले आहे. सोमण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की, “वीर सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केली जाणारी काही मते पुसली जावीत हा या वेब सीरीज बनवण्यामागे आमचा हेतु आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल असून सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते लोकांपर्यंत मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे”.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.