पुणे - चक्क पाईपमध्ये केले धनेशाने घरटे; कारण...

    01-Mar-2024   
Total Views |

    राखी धनेशाने थेट केलं इमारतीच्या गॅलरीतच घरटं; शहरी अधिवासाशी जुळवून घेत आहेत का वन्यजीव? वाचा सविस्तर... 

Grey Hornbill


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्यातील विमाननगर परिसरामध्ये एका इमारतीच्या गॅलरीच्या भागात राखी धनेशाने (Grey Hornbill) आपले घरटे बनविले आहे. एसीसाठी किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मानवनिर्मित पाईपचा आधार घेत राखी धनेश (Grey Hornbill) आपला निवारा शोधत आहेत. पुण्यातील स्थानिक वन्यजीव अभ्यासक आणि निरिक्षक स्वयम ठक्कर यांनी या राखी धनेशांचा (Grey Hornbill) व्हिडीओ कॅमेऱ्यात टिपला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राखी धनेशांच्या (Grey Hornbill) हालचालीचे स्वयम निरिक्षण करत असून वीणीच्या हंगामात आपले घरटे ते इथे बनवितात, असं निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. सामान्यपणे, वन्य अधिवासामध्ये असणाऱ्या राखी धनेशांचे (Grey Hornbill) झाडाच्या ढोलीत घरटे आढळते. फलाहारी असणारे हे पक्षी जोडीने आढळतात. नर आणि मादी एकत्रितपणे रहात असून विणीच्या वेळी मादी घरट्यात बसून राहते तर, नर हा मादी आणि पिल्लांसाठी खाद्य घेऊन येतो. विमाननगर परिसरातील या इमारतीच्या गॅलरीत दरवर्षी धनेश पक्ष्याची ही जोडी घरटे तयार करते. नैसर्गिक अधिवासात धनेश पक्षी एकच ढोलीत दरवर्षी आपले घरटे तयार करतात. दरवर्षी ढोली स्वच्छ करुन तिचा वापर करतात. विमाननगर परिसरातील धनेशाची जोडी देखील पाईपमधील पोकळी दरवर्षी स्वच्छ करते आणि त्यामध्ये पिल्लाला जन्म देते. 
 

हे पाहिलंत का?: Hornbills MahaMTB
 
झपाट्याने वाढत चाललेल्या औद्योगिकीकरणाकडे पाहिले तर त्याचा पक्ष्यांवर वन्यजीवांवर त्याचा परिणाम होतो. मात्र, या घटनेमुळे केवळ वन्य अधिवासापुरतेच मर्यादित न राहता आता राखी धनेश (Grey Hornbill) शहरी अधिवासाशी जुळवून घेताना दिसत आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.