परिवर्तनाचे पर्व...

    08-Feb-2024   
Total Views |
PM Modi

आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप युद्धपातळीवर काम करत आहे. लोकसभा निवडणुकीची धुरा स्वतः पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि ’एनडीए’ला 400 हून अधिक जागा जिंकण्यात यश येईल, असा दावा मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी, भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. याच मालिकेत भाजप प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याची रणनीती बनवत आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक ही एक संधी मानून, भारतीय जनता पक्षाने पुढील 25 वर्षांसाठी नव्या धोरणात्मक संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत तरूण आणि महिलांना प्राधान्याने तिकीट देऊन, पुढील 25 वर्षांसाठी अत्यंत दमदार आणि सक्रिय पक्ष संघटनेची रणनीती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ’व्हिजन’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हे सर्व आवश्यक आहे. खुद्द पंतप्रधानांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या सविस्तर अभिभाषणातूनही याचे संकेत दिसून येतात.हे समजून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अमृत कालाची व्याप्तीही समजून घेतली पाहिजे. 2047 पर्यंत भारताला अमृत काल मानून, जागतिक महाशक्ती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत देशाला सक्षम आणि अत्यंत उत्साही राजकीय पक्षाची गरज आहे. अशा स्थितीत नव्या लोकसभेत अत्यंत तरूण चेहर्‍यांची गरज असल्याचे संकेत पंतप्रधानांनी आधीच दिले आहेत. यामध्येही नारीशक्तीची खूप गरज भासणार आहे. ’नारीशक्ती वंदन कायदा’ महिला आरक्षणाच्या रुपाने मंजूर झाला असला, तरी त्याची अधिकृत अंमलबजावणी होण्यासाठी अद्याप बरेच तांत्रिक काम बाकी आहे. अशा स्थितीत भाजप आपल्या तिकीट वाटपात स्त्रीशक्तीची पूजा करण्याची चिन्हे स्पष्टपणे लक्षात घेऊन, महिला प्रतिनिधित्व वाढवू शकते. भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणार्‍या पक्षांसाठी हे पाऊल अडचणीचे ठरेल. कारण, केवळ राजकीय घोषणा देण्यातच व्यस्त असलेले, राजकीय पक्ष महिलांना समान प्रतिनिधित्व देत नाहीत. यातून देशातील महिलांना स्पष्ट संदेश देऊन, भाजप अर्धी लोकसंख्या स्वतःशी जोडू शकते.

यंदाची लोकसभा निवडणूक किती वेगळी असणार आहे, याचे संकेत म्हणजे, अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेवेळीचे पंतप्रधानांचे भाषण. ज्यामध्ये त्यांनी कालचक्रात बदल आणि पुढील एक हजार वर्षांच्या भारताच्या शाश्वत प्रवासाचा पाया, यावर विशेष भर दिला होता. पारंपरिक राजकारणाची गणिती सूत्रे सिद्ध करणार्‍या तथाकथित राजकीय भाकिते करणार्‍यांच्या, हे समजण्यापलीकडचे आहे. आपला तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या आणि अत्यंत कठोर निर्णयांनी भरलेला असणार आहे, असे सांगताना खुद्द पंतप्रधानांनी संसदेत याचे संकेत दिले.आता राजकारण बदलत आहे. राजकारणातील मठाधिपती संपणार असून, नव्या सक्रिय चेहर्‍यांना स्थान मिळेल. याचा प्रत्यय भाजपच्या तिकीट वाटपातही पाहायला मिळणार आहे. पारंपरिक राजकारणाच्या व्याख्येत अत्यंत दिग्गज मानल्या जाणार्‍या चेहर्‍यांना तिकीट यादीत स्थान मिळाले नाही, तर नवल वाटण्याची गरज नाही. टीम ‘इंडिया’च्या उभारणीसाठी संघटनात्मक समर्पणासह नवीन, उत्साही चेहरे आवश्यक आहेत. असो. ही निवडणूक फक्त एकाच चेहर्‍याची आहे. प्रत्येक तिकिटावर नरेंद्र मोदींची छाप असेल. निवडणूक चिन्हावर मते मिळवायची आहेत. त्यामुळे तिकीट वाटपामध्ये भाजपतर्फे अतिशय महत्त्वाचे बदल करण्यात येतील, यात शंका नाही.
 
आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप युद्धपातळीवर काम करत आहे. लोकसभा निवडणुकीची धुरा स्वतः पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि ’एनडीए’ला 400 हून अधिक जागा जिंकण्यात यश येईल, असा दावा मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी, भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. याच मालिकेत भाजप प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याची रणनीती बनवत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. तसेच जागांसाठी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांच्याशी चर्चा सुरू आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू हीच शक्यता तपासण्यासाठी दिल्लीत गुरुवारी रात्री पोहोचले आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आंध्र प्रदेशात ज्या ज्या ठिकाणी भाजपचा जोर नाही, तेथे-तेथे चंद्राबाबूंची मदत घेण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अर्थात, आंध्र प्रदेशात केवळ चंद्राबाबूच नव्हे, तर पवन कल्याण यांच्यासोबतही समन्वय साधावा लागणार आहे.
 
भाजपने पंजाबमध्ये अकाली दलाशीही चर्चा सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कृषी विधेयकांना विरोध करत, ’एनडीए’तून बाहेर पडलेल्या अकाली दलाला पुन्हा ’एनडीए’मध्ये सामील करण्याची चर्चा सुरू आहे. अकाली प्रमुख सुखबीर बादल यांनी पंजाबमध्ये युतीसाठी भाजपच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी चर्चा केली असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची स्थिती बघितल्यास, दोघांनी मिळून लोकसभा निवडणूक लढवल्यास फायदा होऊ शकतो.उत्तर प्रदेशात भाजपची स्थिती अतिशय मजबूत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तेथे भाजपला मोठ्या विजयाची हमी आहे. मात्र, उत्तर प्रदेशातून सर्वांत मोठा विजय प्राप्त करण्यासाठी, उत्तर प्रदेशातही ‘एनडीए’बाहेरील पक्षांची चाचपणी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये समावेश आहे-तो राष्ट्रीय लोक दलाच्या (रालोद) जयंत चौधरी यांचा. त्यामुळेच आता प. बंगाल आणि बिहार पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही ‘इंडिया’ आघाडी उद्ध्वस्त होण्याची कुणकुण लागली आहे. असे झाल्यास उत्तर प्रदेशातही जागावाटप हेच ’इंडिया’ आघाडी तुटण्याचे कारण ठरणार आहे.

जयंत गेल्या पाच वर्षांपासून सपसोबत युतीमध्ये आहेत. दि. 19 जानेवारी रोजी अखिलेश यादव यांनी जयंत चौधरी यांच्यासोबत 2024ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत अखिलेश यादव यांनी जयंत चौधरी यांना लोकसभेच्या सात जागा देण्याचे आश्वासन दिले होते. ’रालोद’ला बागपत, मुझफ्फरनगर, कैराना, बिजनौर, मथुरा, हाथरस आणि अमरोहा या जागा देण्याचे आश्वासन दिले होते. ’रालोद’ला केवळ सातच जागा देण्याचे कारण म्हणजे ’रालोद’ने राज्यस्तरीय पक्षाचा गमावलेला दर्जा. अखिलेश यांनी ‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला केवळ विधानसभेच्या आधारावर ठरवला. मात्र, अखिलेश यांच्या एका अटीने जयंत चौधरी हे कमालीचे दुखावले गेले आहेत. ती अट म्हणजे, ’रालोद’ला दिलेल्या सातपैकी चार जागांवर चिन्ह ‘रालोद’चे असेल; परंतु उमेदवाराचे नाव मात्र सप ठरवेल. त्यामुळे जयंत चौधरी हे नाराज झाले असून, त्यांची भाजपसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांची ’भारत जोडो न्याय यात्रा’ दि. 14 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तो मुहूर्त साधूनच, जयंत चौधरी ’एनडीए’मध्ये येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.