आयपीओ अपडेट : आर के स्वामी कंपनीचा आयपीओ ४ तारखेपासून बाजारात दाखल
प्राईज बँड २७० ते २८८ रूपये प्रति इक्विटी समभाग
मुंबई: आर के स्वामी कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) हा गुंतवणूकदारांसाठी मार्च ४, २०२४ ला शेअर बाजारात खुला होणार आहे. आयपीओत ५ रूपये प्रत्येकी दर्शनी मूल्यावर इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओची प्राईज बँड हा २७० ते २८८ रूपये प्रति समभाग (शेअर्स) इतका कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. हे समभाग खरेदी करण्यासाठी किमान ५० इक्विटी समभाग खरेदी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याहून अधिक खरेदी करण्यासाठी ५० समभागात प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ पूर्व गुंतवणूकीची तारीख १ मार्च २०२४ ठेवण्यात आल्याचे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले गेले आहे.
आयपीओचे फ्रेश शेअर (समभाग) हे १७३ कोटी रुपयांचे खरेदीसाठी व (ऑफर फॉर सेल) ओएफएस हे ८७ लाखांचे इक्विटी शेअर्स असतील. या आयपीओतून आलेल्या निधीपैकी ५४० दशलक्ष रूपयांचा वापर वर्किंग कँपिटल गरजेसाठी तसेच डिजिटल व्हिडिओ कंटेंट प्रोडक्शन (डिव्हीसीपी) उभारणीसाठी १०९.८५ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. याशिवाय हंसा रिसर्च ग्रुपमध्ये आयटी इन्फ्रास्ट्रक्चरल गुंतवणूकीसाठी ५४० दशलक्ष रूपये व हंसा कस्टमर इक्विटी प्रायव्हेट फंडमध्ये ३३३.४२ दशलक्ष रुपये, कस्टमर सर्व्हिस एक्सपीरिंयस सेंटर उभारणीसाठी २१७.३६ दशलक्ष रूपये व इतर दैनंदिन कामकाजासाठी या निधीचा विनिमय करण्यात येणार आहे.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील गुंतवणूकीचा पर्याय आणत यामध्ये प्रति समभागात कर्मचाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ७५ दशलक्ष रूपयांचे समभाग या आयपीओत उपलब्ध असतील. पात्र कर्मचाऱ्यांसाठी (एम्प्लॉइ रिझर्व्हेशन पोर्शन) (कर्मचारी सूट) योजनेअंतर्गत प्रति समभाग २७ रूपया दराने गुंतवणूकीत उपलब्ध होणार आहे. एसबीआय कँपिटल मार्केट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटी लिमिटेड व मोतीलाल ओसवाल अँडव्हायजर लिमिटेड या कंपन्यांमार्फत बूक रनिंग लीड मॅनेजर (बीअरएलएम) ही ऑफर देण्यात येईल.
अप्पर बँडसाठी कंपनीचा एकूण इश्यू किंमत ४२३ कोटी रूपये असणार आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे १४५० कोटी रुपयांच्या घरात आहे. कंपनीचे संस्थापक श्रीनिवासन के स्वामी व नरसिंहम क्रिष्णास्वामी ऑफर फॉर सेल अंतर्गत आपल्याकडील प्रति १७८८०९३ किंमतीचे इक्विटी समभाग विकणार आहेत. प्रमोटरचे आर के स्वामी कंपनीतील यांच्यातील ८८.४४ टक्क्यांचे समभाग नावावर आहेत व उर्वरित १५.५६ टक्के समभाग इव्हास्टन पायोनिर लिमिटेड प्रेम मार्केटिंग व्हेंचर एल एल पी यांच्याकडे असुन त्यांची विक्री या कंपन्यांकडून करून आपला हिस्सा गुंतवणूकदारांसाठी खुला करणार आहेत.
आर के स्वामी कंपनी मिडिया, डेटा अनालिटिक्स, मार्केट रिसर्च अशा विविधांगी सुविधा ग्राहकांना पुरवते. या आयपीओत गुंतवणूकीसाठी शेवटची तारीख मार्च ६ असणार आहे.