झी एंटरटेनमेंटमध्ये मोठी हालचाल : रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मोठी माहिती समोर

अखेर झी व्यवस्थापनाचा चौकशीसाठी तीन सदस्यीय सल्लागार समिती नेमण्याचा घेतला निर्णय

    24-Feb-2024
Total Views |

Zee
 
 
 
मुंबई: झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस कंपनीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सेबीने सुरू केलेली चौकशी, पुनित गोयंका व सोनीसोबत उडलेले खटके, सोनीबरोबर तुटलेले 'डिल', व कंपनीवर झालेले २००० कोटी गहाळ झाल्याचे आरोप या सगळ्या पूर्व घटनांमुळे झीच्या स्टेक होल्डर, समभागधारकात व गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याने अखेर झी कंपनीच्या व्यवस्थापनाने तीन स्वतंत्र सदस्यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
 
निवृत्त न्यायाधीश सतीश चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे काम चालणार आहे. चंद्रांशिवाय या समितीत उत्तम अग्रवाल, पी व्ही रामण्णा मूर्ती असणार आहेत.
 
झी कंपनीने स्टॉक एक्सचेंजमधील फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कंपनी बद्दल जनमानसातले समज, गैरसमज, कंपनी बद्दल सामान्यांच्या मनात नकारात्मकता व कंपनीच्या प्रतिष्ठेचे नुकसान व चालू झालेले आर्थिक नुकसान याची एकत्रितपणे नोंद या समितीमार्फत घेण्यात येईल' असे या फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे.