मुंबई(विशेष प्रतिनिधी): कंबोडियामधील मूळ प्रजातीचे वाघ नामशेष झाले असूनभारतातुन कंबोडियामध्ये वाघ स्थानांतरित (Tiger translocation) केले जाणार आहेत. २०२४अखेर हे आंतरराष्ट्रीय स्थानांतरण करण्यात येणार असून कंबोडियातील वाघपुनरूज्जीवीत करण्यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. यामध्ये भारतीय प्रजातीच्या एक नर आणि तीन मादी वाघीणींचा समावेश असणार आहे.
दोन वर्षापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेतून चित्ते स्थलांतरित केले होते. हे चित्ते मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले असून याचित्त्यांवर सर्वांचच लक्ष असतं. भारतातील चित्ते नामशेषझाल्यानंतर ते पुनरुज्जीवीत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून त्यांना आणले गेले होते.त्या प्रमाणेच, कंबोडियामधील (Tiger translocation) वाघ शिकारी, तस्करी आणित्यांचे शिकार असलेले प्राण्यांची ही शिकार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नामशेषझाले. आता हे वाघ पुनरुज्जीवीत करण्यासाठी भारतीय प्रजातीचे वाघ कंबोडियामध्ये नेण्यातयेणार आहेत. हे आंतरराष्ट्रीय स्थानांतरण यशस्वी झाल्यास अशाप्रकारे आणखी १२ वाघकंबोडियामध्ये स्थानांतरित करण्यात येतील अशी माहिती आहे.
कंबोडियासह लाओस आणि व्हिएतनाम या दोन्ही देशात वाघ नामशेष झालेअसल्याची शक्यता आहे. तर म्यानमारमधील जंगलात केवळ २३ वाघ शिल्लक असल्याची नोंदआहे. शिकारी आणि तस्करीमूळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच, या प्रजाती पुनरुज्जीवीत (Tiger translocation) करण्यासाठी हा प्रकल्प केला जात आहे.