नवी दिल्ली : मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम सबंध जगाला भेडसावत असतानाच आता याविरोधात इंग्लंडमधील सुनक सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. इंग्लंडमधील सर्व शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय येथील सरकारकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, युरोपीय देशांतील फ्रान्स, इटली आणि पोर्तुगालसह मोबाइल फोन वापरावर निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने हे पाऊल इंग्लंड उचलेल, असे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील सरकारने सांगितले.
इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 'X'वर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली आहे. यूकेचे पंतप्रधान म्हणाले, "माध्यमिक शाळेतील जवळजवळ एक तृतीयांश लोकांनी सांगितले की, फोनद्वारे त्यांना शालेय धडे समजण्यास कठीण गेले." ते म्हणाले, या बंदीच्या निर्णयामुळे आमच्या सरकारने शिक्षणाकरिता चांगले वातावरण निर्माण केले आहे. यासाठीच आधीच शाळांच्या कॅम्पसमध्ये मोबाइल फोनवर बंदी घालण्यात आल्याचेही पंतप्रधान सुनक यांनी स्पष्ट केले.