कल्याण: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चिकनघर येथील मॅक्सी ग्राउंड येथे खेळ पैठणीचा या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला पोलीस अणि कल्याण - डोंबिवली महापालिकेतील महिला भगिनीसाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजप कल्याण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रमूख उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस साडी अणि आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत