मुंबई : 'महापारेषण'च्या मुख्य कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस संचालक (संचलन) संदीप कलंत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.
यावेळी उपमहाव्यवस्थापक (मा. सं. आस्थापना) अभय रोही, उपमहाव्यवस्थापक (मा.सं. मनुष्यबळ नियोजन), नितीन कांबळे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) सचिन खडगी, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मंगेश शिंदे, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) तथा शिष्टाचार अधिकारी सतीश जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.