भारतीय सैन्यासाठी २०२४ मधील बदल जागतिक परिवर्तनाशी संबंधित आहेत, जे युद्धाचे स्वरूप ठरवतात. भू-राजकीय बदलांमुळे देशाचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना प्राणघातक स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान आणि क्वांटम तंत्रज्ञान युद्धात निर्णायक ठरताना दिसत आहेत.
युद्धाचे बदलते स्वरूप आणि भू-राजकीय समीकरणांना प्रतिसाद म्हणून, भारतीय लष्कर एकत्रित आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांची जोरदार तयारी करताना दिसते. सध्या १४ लाख लष्करी जवानांच्या बळावर लष्कराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे, युद्धाचे अनिश्चित स्वरूप आणि पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षेशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कराची व्यापक भूमिका. नुकत्याच झालेल्या लष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, ”२०२४ हे वर्ष भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञान स्वीकारण्याचे वर्ष असेल. २०२३ हे वर्ष ‘परिवर्तनाचे वर्ष’ म्हणून साजरे करण्याच्या पूर्वीच्या घोषणेच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावरच नवा भर ही अतिशय महत्त्वाची घटना आहे.”
भारतीय लष्कर आपल्या पायदळ, तोफखाना आणि सशस्त्र बटालियनमध्ये ड्रोन आणि काऊंटर ड्रोन प्रणाली एकत्रित करणार आहे, जे एक दूरगामी वृत्ती दर्शवते. याव्यतिरिक्त संरचनात्मक स्तरावर ‘कमांड सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स’ची (सीसीओएसडब्ल्यू) स्थापना सायबर क्षमता वाढविण्याच्या वचनबद्धतेवर जोर देते. ’अग्निवीर’ भरतीद्वारे ताज्या मनुष्यबळासह तोफखानासारख्या लष्कराच्या प्रमुख भागांमध्ये झालेले बदल, उदयोन्मुख धोक्यांशी लष्कराची अनुकूलता दर्शवितात. याशिवाय प्रादेशिक लष्कराच्या माध्यमातून तज्ज्ञ अधिकारी तयार करून, लष्कर आपल्या मानव संसाधनाचा विस्तार करत आहे. या तज्ज्ञ अधिकार्यांमध्ये नागरी-लष्करी भरतीद्वारे सायबर तज्ज्ञ तयार करणे समाविष्ट आहे.
सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये ड्रोन आणि काऊंटर ड्रोन प्रणाली अखंडपणे ऑपरेट करण्याच्या योजनांमध्ये मोठ्या बदलासाठी उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. २ हजार, ५०० सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हिजन (संभव) हॅण्डसेटच्या समावेशासह, संवाद महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यावरून लष्कराची तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता दिसून येते. संवेदनशील कामात गुंतलेल्या अधिकार्यांना ३५ हजार संभव हॅण्डसेट वितरित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सुरक्षित आणि कार्यक्षम संप्रेषण चॅनेलची वचनबद्धता दर्शवते. ही सर्वसमावेशक रणनीती मानवी भांडवलाला आधुनिक युद्धाच्या मागणीसह एकत्रित करते आणि अशा प्रकारे २०२४ मध्ये भारतीय सैन्याला तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील शक्ती म्हणून प्रोजेक्ट करते.
भारतीय सैन्यासाठी २०२४ मधील बदल जागतिक परिवर्तनाशी संबंधित आहेत, जे युद्धाचे स्वरूप ठरवतात. भू-राजकीय बदलांमुळे देशाचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना प्राणघातक स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान आणि क्वांटम तंत्रज्ञान युद्धात निर्णायक ठरताना दिसत आहेत. भारतासाठी गैरलष्करी डावपेच वापरण्याची चीनची वाढती क्षमता, विशेषतः गलवान संघर्षानंतर भारतीय सीमेजवळ एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. अलीकडेच लष्करप्रमुखांनी आपल्या एका संबोधनात म्हटले आहे की, ”संघर्ष करण्यासाठी बिगर लष्करी हल्ले झपाट्याने पसंतीचे धोरण बनत आहे आणि तांत्रिक प्रगतीमुळे त्याची व्याप्ती वाढत आहे.” लष्करप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे हे सांगितले. याकडे लक्ष वेधून चीन दोन्ही आणि पाकिस्तान गैरलष्करी रणनीती वापरण्याचा प्रयत्न करत आहे. लष्करप्रमुखांनी भर दिला की, अशा आक्रमकतेची गुरुकिल्ली म्हणजे संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकास यामध्ये ‘आत्मनिर्भरता’ ही आहे.
चीन आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा धोका पाहता, भारताला संकरीत अर्थात ‘हायब्रिड’ धोक्यांचा सामना करावा लागत आहे. पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचे मिश्रण असलेल्या काश्मीर खोर्यात ‘हायब्रीड’ दहशतवादाचा सामना भारतीय सैन्य समर्थपणे करतच आहे. या आव्हानांना प्रत्युत्तर देताना, भारतीय लष्कराने अप्रचलित क्षमता आणि शस्त्रे केवळ तांत्रिकदृष्ट्या आधुनिक पर्यायांनी बदलली पाहिजेत असे नाही, तर सामरिक क्षमतादेखील वाढवायला हवी. यासाठी मानवरहित हवाई वाहने, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासारख्या चांगल्या तंत्रज्ञानात प्रावीण्य असलेल्या विशेष युनिट्सवर भर दिला पाहिजे, त्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले आहे. उपग्रह प्रतिमा, ड्रोन आणि आधुनिक सेन्सर्ससह अत्याधुनिक टेहळणी तंत्रज्ञानाचा वापरही भारतीय सैन्य अतिशय प्रभावीपणे करत आहे. गैरलष्करी डावपेचांशी संबंधित डिजिटल धोक्यांपासून सैन्याच्या गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यात सायबरसुरक्षा उपाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
’इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स’ (आयडेक्स) सारख्या उपक्रमांच्या स्थापनेसह ऑपरेशनल आणि धोरणात्मक आव्हानांसाठी नावीन्यपूर्ण उपायांसाठी नागरी क्षेत्र, विशेषतः शैक्षणिक आणि उद्योग यांच्याशी लष्कराची प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे. तांत्रिक कौशल्य ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे. मानव संसाधनांच्या विशेष आणि स्वतंत्र केडरची स्थापना ही एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणून उदयास येते, जी दीर्घकाळात अर्थपूर्ण परिणाम देईल. अलीकडेच लष्कराने एक नवीन धोरण सुरू केले. ज्याअंतर्गत ’एआय’, रोबोटिक्स आणि ड्रोन यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य असलेल्या लेफ्टनंट कर्नलन्सना कर्नल पदोन्नतीसह या क्षेत्रात राहण्याची परवानगी देण्यात आली. या धोरणाची परिणामकारकता पडताळून पाहण्यासाठी, तीन वर्षांनी त्याचे पुनरावलोकन केले जाईल. त्यामुळे चालू वर्षात भारतीय लष्करामध्ये अनेक प्रकारचे आमूलाग्र बदल होणार आहेत, यात कोणतीही शंका नाही.