मुंबई: टाटा पॉवरने आपल्या विस्तारीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जलपूरा खुरजा पॉवर प्रकल्प हा टाटा पॉवर कंपनी खरेदी करणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. यासंबंधी जलपूरा खुरजा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प सुमारे ८३८ कोटी रूपयांनी खरेदी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी टाटा पॉवरने शुक्रवारी आपल्याला आर ई सी पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीडून लेटर ऑफ इंटेट ( एल ओ एल ) पत्र मिळाल्याचे जाहीर केले होते. टाटा पॉवरकडून हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास स्पेशल परपज व्हेईकल ( एस पी व्ही) आधारे पुढील ३५ वर्षासाठी कंपनीकडून ही सेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने एक्झचेंज फाईलिंगमध्ये स्पष्ट केली आहे.
प्रकल्प हस्तांतरित केलेल्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत हा ' ट्रान्समिशन 'प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे. याविषयी बोलताना, आम्हाला राईसी पॉवर डेव्हलपमेंटच्या खुरजा पॉवरकडून लेटर ऑफ इंटेट मिळाले असून एस पी व्ही अंतर्गत हा विशेष प्रकल्प असेल याची किंमत अंदाजे ८३८ कोटी रुपये इतकी असणार आहे.
शुक्रवारी टाटा पॉवरचे शेअर्स तेजीत दिसून बीएसीला ३७६.१५ अंशाने वाढले होते. आर ई सी पी डी एल ही आर ई सी कंपनीची उपकंपनी आहे. ही ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. यामुळे भविष्यात टाटा समुहाकडून या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.