तेलंगणात २१ कुत्र्यांना गोळ्या घालून ठार; औवेसींचं 'ते' विधान त्यानंतर...

    17-Feb-2024
Total Views |
21-dogs-shot-dead-in-telangana

नवी दिल्ली :
तेलंगणात चक्क २१ कुत्र्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा तपास तेलंगण पोलिसांकडून करण्यात येत असून या गोळीबारात ५ कुत्रेही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या दिवशीच स्थानिक आमदार अकबरूद्दीन औवेसी यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विधानसभेत भाषण केले होते.

दरम्यान, अकबरुद्दीन औवेसी यांनी विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात मुद्दा मांडला होता. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्याच राज्य तेलंगणामध्ये २१ कुत्र्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ०१:३० ते ०२:३० च्या दरम्यान सदर गोळीबार करण्यात आला. मीडियाच्या अहवालानुसार, ही घटना अमानवीय कृत्य मास्कधारी लोकांनी घडवून आणली आहे.

तेलंगणातील ही घटना महबूब नगर जिल्ह्यातील असून याठिकाणी २० हून अधिक कुत्र्यांना गोळ्या घालण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून चार जण आले. त्या सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते. या लोकांनीच कुत्र्यांवर गोळीबार केला, असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.

सदर गोळीबार घटनेतील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या घटनेत गोळी लागल्याने अनेक कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही कुत्रे पळून जाताना मरण पावले. सुमारे ५ कुत्रे सुदैवाने बचावले कारण त्यांना गोळी लागली पण ते जिवंत आहेत. त्या जखमी कुत्र्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तेलंगणा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून एकाच वेळी इतक्या कुत्र्यांवर गोळीबार कोणी केला, गोळीबार करण्याचा उद्देश काय होता? याप्रकरणी अडकल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पशुवैद्यकांची मदत घेतली जात असून संबंधित प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालातूनही काही खुलासा होऊ शकतो, जो अद्याप आलेला नाही.