राजकोट : भारत व इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावांचा डोंगर उभारला. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने २ बाद २०७ धावा केल्या आहेत. बेन डकेट १३८ धावांवर तर जो रूट ९ धावांवर खेळत आहे.
दरम्यान, भारताकडून आर. आश्विन व जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या आहेत. आर. आश्विनने जॅक क्रॉव्हली याची विकेट घेत आपल्या कसोटी कारकीर्दीतील ५०० विकेट्सचा टप्पा पार केला. भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणून आर. आश्विनकडे पाहिले जाईल.
या कामगिरीनंतर आर. आश्विन म्हणाला, सर्वप्रथम मी हा विक्रम माझ्या वडिलांना समर्पित करू इच्छितो. इंग्लंड एकदिवसीय किंवा टी-20 सामन्याप्रमाणे खेळत आहे. आम्हाला विचार करण्यासारखे बरेच काही दिले आहे, आम्ही जे करत आहोत ते करत राहावे लागेल आणि आशा आहे की एक सामन्यात टर्निंग पॉईंट येईल. इंग्लंड अशा स्थितीत आहे जिथे मला वाटते की खेळ शिल्लक आहे, ते आमच्यावर दबाव आणत आहेत परंतु आम्ही तयार राहून खेळात राहणे महत्वाचे आहे, असे आऱ. आश्विन दुसऱ्या दिवसाच्या खेळ समाप्तीनंतर म्हणाला.