येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात 'नमो महारोजगार मेळावा'! मंत्री लोढांची माहिती
15-Feb-2024
Total Views |
ठाणे : नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या युवक आणि युवतींकरिता लवकरच ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली. तसेच या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. याआधी नागपूरमध्ये हा नमो महारोजगार मेळावा पार पडला. त्यानंतर आता येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील माजीवडा येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे."
नोकरी इच्छुक युवकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
नमो महारोजगार मेळावा!
दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024
स्थळ: हायलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवडा, ठाणे पश्चिम
"या मेळ्याव्यात ४०० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. भारतात काम करु इच्छिणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या याठिकाणी आपले स्टॉल लावणार आहेत. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकास, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सॉफ्ट स्किल्स विकासाचे सत्रदेखील घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी महारोजगार मेळाव्याच्या पुर्वी इच्छुक मुलामुलींसाठी प्रशिक्षणदेखील आयोजित करण्यात येईल. मेळावा संपल्यानंतरही जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. कोणीही या मेळ्याव्यातून रिकाम्या हाताने जाणार नाही," असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही मंत्री लोढांनी केले आहे.
नमो महारोजगार मेळाव्याचे स्थळ आणि वेळ पुढीलप्रमाणे -
स्थळ : हायलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवडा, ठाणे पश्चिम