वैतरणा नदीत युवकावर शार्कचा प्राणघातक हल्ला: पायाचा लचकाच तोडला

    14-Feb-2024   
Total Views |
bull shark



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वैतरणा नदी परिसरातील मनोर गावात एका युवकावर शार्क (bull shark) माशाने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. (bull shark) मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सरपणाकरिता लाकडे आणण्यासाठी नदीच्या प्रवाहात उतरलेल्या या युवकावर शार्कचा हल्ला झाला. या हल्लात युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (bull shark)
 
 
मनोर डोंगरी येथील वैतरणा नदीच्या प्रवाहात विकी गोवारी हा युवक उतरला होता. यावेळी ओहोटी असल्याने नदीत पाण्याची पातळी कमी होती. त्यामुळे नदीच्या प्रवाहात उतरून विकी लाकडे गोळा करण्यासाठी जात होतो. त्यावेळी शार्क प्रजातीच्या एका माशाने त्याच्यावर हल्ला चढवला. विकीने आरडाओरड केल्याने ग्रामस्थानी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शार्कने विकीच्या डाव्या पायाचा लचका तोडला होता. ग्रामस्थांनी विकीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
  
विकीवर हल्ला करणारी शार्कची प्रजात ही बूल शार्क आहे. ही प्रजात आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते. समुद्राबरोबरच, नदी आणि खाड्यामध्ये ती आढळते. प्रौढ नर बूल शार्क हा ८ फूटांपर्यत वाढू शकतो. त्याचे वजन १३० किलोपर्यंत असू शकते. विकीला शार्कच्या तावडीतून सोडवल्यानंतर गावकऱ्यांनी त्या शार्कला मारून टाकले. त्यानंतर त्याचे वजन केले असता, ते १२० किलो असल्याचे समजले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.