सरकारने रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म केले - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना केलेल्या भाषणात विकसित भारताचा व्यक्त केला निर्धार

    10-Feb-2024
Total Views |

Modi
 
 
सरकारने रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म केले - पंतप्रधान मोदी
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांना केलेल्या भाषणात विकसित भारताचा व्यक्त केला निर्धार
 


नवी दिल्ली : आज देशातील १७ व्या लोकसभेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार भाषणाने झाली. या भाषणात सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा मोदींंनी आपल्या भाषणात मांडला. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत अमृतकाळात उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने केलेल्या बदलांचा वेध संसदेत घेतला गेला. संरक्षण, विकास, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारीत मोदी सरकारने कामाची पोचपावती देण्यासाठी १७ व्या लोकसभेतील घेतलेले निर्णय व केलेले कायदे पंतप्रधानांनी नमूद केले.
 
 
मुख्य म्हणजे कोणतेही राजकीय पुरस्कृत भाषणाला प्राधान्य देता देशहितासाठी पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक न्याय, संरक्षण, संशोधन, संधी, व्यवसाय सुलभीकरणावर मांडलेले काही ठळक मुद्दे
 
 
5 वर्षात सरकार रिफॉर्म परफॉर्म, ट्रान्सफॉर्म प्रणालीने सरकार चालले.
 
या काळात जी २० च यजमानपद भारताला मिळाले.
 
कोरोना काळात सरकारने अनेक उपाययोजना केल्या.
 
कोरोना काळात मानधनातील रक्कम कपातीची परवानगी दिल्याबद्दल सगळ्या खासदारांचे अभिनंदन
 
गेल्या काही वर्षात भारताचा सन्मान जगभरात वाढला आहे.
 
संसदेच ग्रंथालय अध्यक्षांनी सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे.
 
प्रत्येक राज्याने उत्तम नियोजन करून दाखवले
 
१७ व्या लोकसभेची उत्पादकता ९७ टक्के
 
२१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गेमचेंजर रिफॉर्म केले गेले आहेत.
 
१७ व्या लोकसभेने विविध विक्रम नोंदवले.
 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
 
देशात एक संविधान हे स्वप्न पूर्ण झाल.
 
अनेक पिढ्या वाट पाहत होत्या अशी काम झाली.
 
सामाजिक न्यायापासून वंचित काश्मिरी लोकांना न्याय मिळाला
 
संसदेने दहशतवादाविरुद्ध कठोर कायदे केले
 
तीन तलाख प्रथेविरोधात अखेर महिलांना न्याय मिळाला
 
अमृतमहोत्सवात जनतेमध्ये चैतन्य
 
भारताला विकसित बनवणे प्रत्येक भारताचे स्वप्न
 
पुढची पिढी न्यायसंहिता पाहिल
 
नारी शक्ती वंदन अधिनियम हे नव्या संसदेची ओळख
 
संशोधनात मानव जातीचे कल्याण आहे
 
१७ वी लोकसभा देशाला आशिर्वाद देणारी
 
युवकांसाठी महत्त्वाचे कायदे संसदेत बनले
 
२१ व्या शतकातील मुलभूत गरजा बदलल्या आहेत
 
डेटा प्रोटेक्शन बिलकडे जगाचे लक्ष
 
जगाने भारताचे सामर्थ्य पाहिले
 
अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने मोठे बदल केले‌
 
इज ऑफ डुईंग बिझनेसमुळे व्यवसायापूरक वातावरण निर्माण झाले
 
कंपनी, पार्टनरशिप कायद्यात पारदर्शकता आली
 
व्यवसायासाठीचे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले
भारताने डिजिटायझेशन प्रस्थापित केले
 
डेटा प्रोटेक्शन बिलामुळे नव्या पिढीला संधी मिळेल
 
२५ वर्षात देश इच्छीत परिणाम प्राप्त करणारच
 
लोकशाही आणि भारताची यात्रा अनंत आहे
 
सबका साथ सबका विकास हा देशाचा मुलमंत्र
 
 
भाषणाच्या शेवटी येणारी निवडणूक देशाची शान वाढविणारी असेल असेही सांगायला पंतप्रधान विसरले नाहीत. त्यामुळे १८ व्या लोकसभेचा वेध देणारे भाषण आगामी निवडणुकीत किती परिणामकारक असेल त्याची शाश्वती पंतप्रधानांनी दिली आहे.