चंदीगड : पंजाब येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी शंभू सीमेवर गालबोट लागले आहे. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव केल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. दिल्ली येथे जाण्यासाठी ज्या १०१ शेतकऱ्यांची यादी दिल्ली पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहे, त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शेतकरी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १०१ शेतकऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दिल्ली येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ही संबंधित यादीत नव्हती. पोलिसांनी त्यांची ओळख न सांगता पुढे जाण्यास नकार दिला. या शेतकऱ्यांना दिल्ली येथे जाण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात नेतृत्व करणारे सर्वनसिंह पंढरे म्हणाले की, शेतकरी कोणत्याही बलिदानासाठी तयार असून पोलिसांना सहकार्य करणार आहे. सर्वन सिंह पंढरे म्हणाले की, त्यांच्या समस्यांचे निराकरण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात.
#WATCH | Police sprinkle flower petals on the farmers at the Punjab-Haryana Shambhu border who are protesting and trying to move ahead as they begin their 'Dilli Chalo' march, today pic.twitter.com/EjIs3vVWsc
त्यानंतर हरियाणा पोलिसांच्या एका जवानाने सांगितले की, त्यांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव जरी केला असला तरीही त्या प्रत्युत्तरात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी शांत राहण्यास सांगितले होते. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांवरही हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणात आतापर्यंत ८ शेतकरी जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पुन्हा दिल्ली येथे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे पायी जाणार असल्याचा निर्धार केला होता.त्यानंतर त्यांनी हरियाणा पोलिसांनी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर बॅरिकेड्स लावून रस्ता रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले.