नेतृत्वहीन बांगलादेशाला माफियांचा विळखा : ममता बॅनर्जी

    07-Dec-2024
Total Views | 80

MAMATA BANERJEE
 
कोलकाता : (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी बांगलादेशातील अशांततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "माफियां"च्या वाढीमुळे आणि "कमकुवत" प्रशासनामुळे बांगलादेश "नेतृत्वहीन" असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील तुरुंगात अटकेत असलेल्या ६९ बंगाली मच्छिमारांच्या दुरावस्थेवर बोलताना त्यांनी भारताच्या केंद्र सरकारला हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
 
जेव्हा त्यांना बंगालला बांगलादेशाकडून रोषाचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल विचारले असता, "लवकरच इतर राज्यांना देखील याचा फटका बसेल. जर कोणी बंगालच्या सीमेवर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर माफ केले जाणार नाही, अगदी बिहार आणि ओडिशालाही . त्यामुळे सर्वच शेजाऱ्यांनी आमच्यासोबत शांततेने राहावे असे मला वाटते," असे त्या म्हणाल्या.
 
बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121