'पुष्पा २’ ठरला सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट

    07-Dec-2024
Total Views |
 
pushpa 2
 
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापुर्वीच रेकॉर्ड मोडला होता. आणि आता ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांमध्येच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा २ चित्रपटाने २८२.९१ कोटी रुपये पहिल्या दिवशी कमवून नवा इतिहास रचला आहे. यापुर्वी राजा मौली यांच्या आरआरआर या चित्रपटाने २२३ कोटी कमावले होते. हा नवा रेकॉर्ड करत पुष्पा २ चित्रपटाने आरआरआर चित्रपटाला मागे टाकले आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने ३१४.५४ कोटी कमावले आहेत.
 
‘पुष्पा २’ने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले आहेत. ओपनिंगच्या दिवशीच या चित्रपटाने ११ नवीन विक्रम करत 'बाहुबली २', 'आरआरआर', 'जवान', 'पठाण' आणि 'कल्की २८९८ एडी' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.