शपथविधीलाही विरोधकांचा गोंधळ! अधिवेशनातून काढता पाय

    07-Dec-2024
Total Views |
 
MVA
 
मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांनी काढता पाय घेत आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर आमदारांना शपथ देत असतानाच ईव्हीएमवर संशय घेत त्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे वाचलंत का? -  मालेगाव वोट जिहाद प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी!
 
७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यातील पहिले दोन दिवस आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. विधानभवन परिसरात मारकडवाडीचे बॅनर दाखवत त्यांनी शपथविधीचा निषेध केला आहे.