मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Trishul in Mahakumbh 2025) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभच्या निमित्ताने महाकाय डमरू तयार करण्यात येत असून सोबतच जगातील सर्वात मोठे त्रिशूलही याठिकाणी उभारण्यात आले आहे. १५१ फूट उंच असलेले हे त्रिशूल उच्च तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीव्र भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही ते कायम उभे राहील, इतकी त्याची क्षमता आहे. जुना आखाड्यात त्रिशूल बसवले गेले आहे.
हे वाचलंत का? : देश 'हिंदू राष्ट्र' व्हावा हीच आमची इच्छा! : नितेश राणे
जुना आखाड्याच्या मौज गिरी आश्रमात सहा वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमध्ये जगातील सर्वात उंच त्रिशूळ बसवण्यात आला होता. ज्याचे लोकार्पण दि. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी देशभरातील संत-महंत आश्रमात जमले होते. स्टीलसह इतर धातूंपासून नव्याने बनवलेल्या या त्रिशूलाचे एकूण वजन ३१ टन पेक्षा जास्त आहे. दररोज सकाळी त्रिशूलाची पूजा केली जाते. त्रिशूलाच्या शीर्षस्थानी डमरू देखील बसविण्यात आला आहे.