बांगलादेशमधील हिंसाचारप्रकरणी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कारवाईची मागणी

प्रिती पटेल यांनी मांडले हिंसाचाराचे वास्तव

    03-Dec-2024
Total Views |

priti patel

नवी दिल्ली : बांगलादेश मध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्नवित अत्याचाराची दखल आता इंगलंड मधील मंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे. ब्रिटीश खासदार बॅरी गार्डिनर आणि प्रिती पटेल यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबतची समस्या इंगलंडच्या संसदेत मांडली.हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सेक्रेटरी ऑफ स्टेट कयांच्याकडे मागणी करण्यात आली की त्यांनी बांगलादेच्या नेतृतवाला याबद्दल जागृत करावे.
 
कॅथरीन वेस्ट यांनी संसदेत सांगितले की त्यांना बांगलादेशच्या आंतरिम सरकारने असे आश्वसन दिले आहे की बांगलादेशातील सरकार अल्पसंख्यांकाती यथायोग्य ती काळजी घेईल. त्याच बरोबर कॅथरीन वेस्ट म्हणाल्या की युनुय यांच्या सह झालेल्या द्विपक्षीय बैठकीत धर्मीक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा करण्यात आली. इंगलंडचे सरकार बांगलादेश मधील धार्मीक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते. हिंदू समाजासाठी विशेषत: बांगलादेशच्या अंतरीम सरकारने असे आश्वासन दिले आहे की अल्पसंख्यांकांना आपले सण साजरे करण्याची संपूर्ण मुभा असेल. हिंदू धार्मिक स्थळांच्या भोवती सुरक्षा यंत्रणा उभारली गेली आहे. चिन्मय कृष्ण दास यांना करण्यात आलेली अटक यामुळे कायदा आणि सुव्यवसथेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बांगलादेश मधील परिस्थीती अत्यंत बिकट असून तिथले धुमसणारे वातावरण हे वेळीच शांत व्हायला हवे.
 
आता जबाबदारी बांगलादेश सरकारचीच!  
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यात ते म्हणाले की " बांगलादेशात सुरू असलेल्या अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्याचा आढावा गांभीर्याने घेतला आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेची जाबबदारी ही बांगलादेशच्या सरकारची आहे. त्यातच आता अगरताळा इथे झालेल्या संघर्ष अत्यंत निंदणीय आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या अल्रपसंख्यांकांच्या अत्याचाराविरोधात अगरताळा येथे काही लोकांनी बांगलादेशातील उच्चायुक्तांच्या कार्यालयात घुसून घेराव घातला.