मी चेकअपसाठी आलो होतो! माझी प्रकृती उत्तम : एकनाथ शिंदे

    03-Dec-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : मी चेकअपसाठी आलो असून माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी त्यांना तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
एकनाथ शिंदेंच्या घशात संसर्ग झाला असून ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काल त्यांना सलाईन लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना आज तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढल्याचीही माहिती आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
 
 
.