काही दिवसांपूर्वीच रशियाने कॅन्सरवरील लस संशोधन यशस्वी झाल्याचे सांगत, पुढील वर्षी ही लस बाजारात उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले. त्यानंतर जगभरात या लसीवरुन विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यानिमित्ताने नेमके या लसीमागचे संशोधन, कॅन्सरच्या आजाराची गुंतागुंत आणि भारताने याबाबतीत करावयाच्या उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख....
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (थकज) च्या मते, कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण राहिले आहे. २०२० साली सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला आहे. फुफ्फुस, लहान-मोठे आतडे आणि यकृत कर्करोग हे सर्वात प्राणघातक आहेत. याव्यतिरिक्त दरवर्षी दोन कोटींहून अधिक नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद होत आहे. हजारो वर्षांचा इतिहास असणार्या आणि प्रत्येक मानवी गुणसूत्रात लपून बसलेल्या या आजारविरुद्ध लढण्यासाठी लसीसारख्या नाविन्यपूर्ण उपचारांची तातडीने गरज आहे. जीवाणू आणि विषाणूंपासून संरक्षणासाठी मानव शेकडो लसी वापरत असताना, कॅन्सरसाठी लस विकसित करणे अधिक आव्हानात्मक आहे. कारण, कॅन्सरच्या पेशी आपल्या सामान्य, निरोगी पेशींसारख्या असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीला त्या शरीरासाठी धोकादायक आहेत म्हणून ओळखणे कठीण होते. तसेच, प्रत्येक व्यक्तीचा ट्यूमर त्याच्या स्वतःच्या विशिष्ट गुणधर्मासह वेगळा असतो. म्हणूनच, या सर्वांमुळे कॅन्सरच्या प्रभावी लसींचा विकास जटिल बनतो. ज्यासाठी प्रगत आणि अनुकूल पद्धतींची आवश्यकता असते.
या आजारांवर दोन आठवड्यांपूर्वी रशियातून आलेल्या एका बातमीने जगाचे लक्ष वेधून घेतले. ‘कॅन्सरची लस’ या शीर्षकाखाली रशियाने दावा केला की, आम्ही अशी लस तयार केली असून, ती लवकरच बाजारात येईल आणि रशियन नागरिकांना मोफत मिळेल. यामुळे साहजिकच भारतीय प्रसारमाध्यमांचे लक्ष या बातमीकडे वेधले गेले. या क्षेत्रातील तज्ज्ञ भारतात आणि जागतिक स्तरावर एकाचवेळी संशयी आणि उत्साही आहेत. याचे कारण असे की, घोषणा जरी एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवत असली, तरी त्यात विश्वासार्ह डेटा आणि तपशीलवार माहितीचा आधार नाही.
लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, कॅन्सरची लस ही इतर लसींसारखी निरोगी लोकांसाठी नसून, जे कॅन्सरचे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी असणार आहे.
कॅन्सर हा सुरुवातीला लक्षण न दाखवता शरीरात पसरणारा आणि नंतर संपूर्ण शरीरावर ताबा घेणारा आजार आहे. कॅन्सरचा ट्यूमर सोडून त्याभोवती अनेक आजारांची गुंतागुंत असते. ही आजारांची गुंतागुंत आणि मूळ ट्यूमरचे गुणधर्म व्यक्तिसापेक्ष असतात, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘शिीीेपरश्रळीशव’ (वैयक्तिककृत) आजार’ म्हणतात. अशा वैयक्तिककृत आजाराला औषध पण वैयक्तिककृतच हवे असते. म्हणजेच कॅन्सरवरती जागतिक बाजारपेठेत ९००पेक्षा अधिक औषधे उपलब्ध आहेत. पण, ती सगळी प्रगत कॅन्सर पेशींना (तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील कॅन्सर) थांबण्यास अपयशी आहेत. औषधे ही आजाराच्या मूळ ठिकाणी किंवा अवयवात जाऊन कार्य करतात, तर लस दुसर्या कुणालातरी त्या आजाराविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करते, जसे आपली प्रतिकारशक्ती. कॅन्सरची लस आपल्या प्रतिकारशक्तीला कॅन्सरविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणार आहे आणि अशी लस प्रत्येक रुग्णांसाठी वेगळी असणारा ज्याला ’शिीीेपरश्रळीशव ाशवळलळपश’ म्हणतात.
रशियातील संशोधकांनी जो दावा केला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्ही लस तयार केली आहे. पण, नक्की ती कोणत्या कॅन्सरवर आहे, हे सांगितले नाही. लसीच्या ‘प्री-क्लिनिकल’ चाचण्यांनी दर्शविले होते की, ते ट्यूमरचा विकास आणि संभाव्य ‘मेटास्टेसेस’ तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यातील कॅन्सरचा प्रभाव रोखते. कॅन्सरचे कमीत कमी २०० प्रकार असून, एकट्या स्तनाच्या कर्करोगाचे ४० उपप्रकार असतात.
कॅन्सरवर लस शोधण्याचे संशोधन गेल्या ३० वर्षांपासून चालू आहे. मूळात ‘कोविड’ची लसच ही कॅन्सरच्या लसीच्या ‘ाठछअ’ प्लॅटफॉर्मवर आधारित होती आणि त्याच संशोधकांनी शोधली आहे. ‘ाठछअ’ लस आपल्या पेशींना प्रथिने किंवा प्रथिनांचा फक्त एक तुकडा जो विषाणूंसारखा असतो, त्यांना बनवण्याचा संदेश देते. प्रथिने नंतर आपल्या शरीरात रोगप्रतिकारक प्रतिसादास चालना देतात. हीच रोगप्रतिकारक शक्ती विषाणू, जिवाणू किंवा कॅन्सरच्या पेशींना मारण्यास सक्षम होते, जी त्याच रोगामुळे कमकुवत झालेली असते. रशियन संशोधकांनी पण हाच प्लॅटफॉर्म वापरला आहे. पण, हे संशोधन अलीकडचे असले तरी २०२३ साली अमेरिकन शास्त्रज्ञांना यासाठी ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच २०२४ साली अमेरिकन ‘मॉडर्ना कंपनीने’सुद्धा फुफ्फुसाचा, त्वचेचा आणि इतर कॅन्सर असणार्या १९ रुग्णांना लस देऊन बरे केल्याचे संशोधन प्रसिद्ध केले होते. त्यांची पण लस २०२५ साली बाजारात येईल.
सध्या जगभरात २०० पेक्षा अधिक कंपन्या आणि विद्यापीठांतील प्रयोगशाळा मिळून कॅन्सरसाठी लस शोधण्याचे काम करत करत आहेत. रशियातील संशोधक यात आघाडीवर आहेत. पण, त्यांनी दावा केलेली लस ही सार्वत्रिक र्(ीपर्ळींशीीरश्र) असेल की नाही, हे त्यांनी जाहीर केले नाही. कॅन्सरची लस शोधण्यात सर्वात मोठा अडथळा जो असतो तो म्हणजे कालावधी. साधरणतः रुग्णाच्या सगळ्या टेस्ट करून, त्याची लस डिझाईन करणे आणि ती तयार करणे, मग पुन्हा रुग्णाला देणे यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. रशियन लसीचे प्रमुख यांच्या मते, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तो कालावधी आम्ही अर्धा ते एका तासावर आणला आहे.” ‘ाठछअ’ सोडून लसीमध्ये इतर कोणते घटक आहेत, हेसुद्धा त्यांनी सांगितले नाही. अशा प्रकारची लस तयार करताना एआयला प्रशिक्षित करण्यासाठी कमीत कमी ४० हजार ते ५० हजार रुग्णांच्या ट्यूमर सीक्वेन्स असलेला प्रायोगिक डेटाबेस आवश्यक असतो. तसेच, रूग्णांमध्ये प्रथिने किंवा ठछअमध्ये रूपांतरित प्रतिजन अनुकूलता ओळखणे आवश्यक असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणवर रुग्णांचा डेटाबेस वापरला आहे की नाही, याची पुढची माहिती देण्याचे त्यांनी टाळले आहे.
लसीची मूलभूत माहिती जाहीर न करता मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी करण्यामागे ‘मेडिकल टुरिझम’ (वैद्यकीय पर्यटन) हे प्रमुख कारण असू शकते. इंग्लंड, अमेरिका, मलेशिया, तुर्कीए, सिंगापूर, भारत आणि थायलंड यांसारख्या प्रस्थापित स्थळांच्या श्रेणीत सामील होऊन रशिया एक प्रमुख खेळाडू म्हणून जागतिक वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात येऊ पाहतोय. या धोरणात्मक बदलाला रशियाच्या कॅन्सर लसीच्या महत्त्वपूर्ण विकासामुळे चालना मिळू शकते, जी जगभरातील मुखत्वेकरून भारत आणि इतर आशियाई देशांतील आरोग्याविषयी जागरूक रुग्णांना आकर्षित करू शकते.
मग भारताला याचा काय फायदा होऊ शकतो? तर अशा प्रकारची ‘mRNA’ आधारित ‘जिन थेरपी’ खूप किचकट आणि खर्चिक असते. त्यासाठी फक्त पैसा असून उपयोग होत नाही, तर कुशल मनुष्यबळ पाहिजे, जे सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. कॅन्सर लस तयार करणारी एकही भारतीय कंपनी सध्या जागतिक बाजारपेठेत दिसून येत नाही. सरकारी संशोधन संस्थापना यामध्ये कुठे नाहीत. भविष्यातील कॅन्सर लसीमध्ये अमेरिका, युरोप, चीन आणि रशिया आघाडी घेताना दिसून येतील. कारण, त्यांनी जवळपास ३० वर्षांपासून यामध्ये संशोधन चालू ठेवले आहे. रशियन संशोधकांची लस कमी किमतीत आहे असे दिसून येते. भारतीय संशोधन संस्था, सरकार आणि काही खासगी कंपन्यांनी याबाबतीत तंत्रज्ञान हस्तांतरण करार केले, तर आपल्याकडे कमी वेळात अशी लस तयार करता येऊ शकेल. यासाठी सुरुवातीला हजारो कोटींची गुंतवणूक करावी लागेल. त्याच जोडीला भारतात दरवर्षी ही किमान ५० लाख नवीन कॅन्सर रुग्ण सापडत आहेत आणि हे प्रमाण २०५० सालापर्यंत तिपटीवर जाईल.
म्हणूनच येत्या काही वर्षांत आपल्याला कॅन्सरवर नियंत्रण मिळवावे लागेल. त्यासाठी संशोधन, जागरूकता नवीन उपचारपद्धती विकसित कराव्या लागतील आणि यासाठी ‘कॅन्सर मिशन’ची नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारची कॅन्सरसाठी वैयक्तिककृत लस म्हणून जर विकसित करायची असेल, तर सर्वात प्रथम कोणते प्रथिने उत्परिवर्तित झाले आहेत, हे पाहण्यासाठी प्रथम व्यक्तीच्या कॅन्सर ट्यूमरचे विश्लेषण केले जाते आणि त्यावरून त्या रुग्णांसाठी ‘ाठछअ’ किंवा प्रथिने यांची लस बनविली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी उपचार वेगळे असण्याची शक्यता असते. अशा प्रकारची लाखो रुग्णांसाठी लस बनवायची असेल, तर कोणत्याही एका कंपनीचे, हॉस्पिटलचे, संशोधन संस्थेचे काम नसून, त्यासाठी खूप छोटी छोटी युनिटे तयार करायला हवीत, ज्याचे जाळे संपूर्ण भारतभर असेल. यासाठी सरकारी आणि खासगी वैद्यकीय संस्थांनी एकत्रितपणे कार्य करावे लागेल आणि हा आपल्या देशापुढील पुढच्या किमान २५ वर्षांचा कार्यक्रम असायला हवा.
डॉ. नानासाहेब थोरात
(लेखक संशोधक असून आयर्लंड येथील विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत.)