डॉ. मनमोहन सिंग यांचा शायराना अंदाज होतोय व्हायरल!

सुषमा स्वराजांसोबत झालेल्या शाब्दिक वादाचे डॉ. मनमोहन सिंग यांचे शायरीत प्रत्युत्तर

    27-Dec-2024
Total Views |
Manmohan singh

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्युत्तर दिले होते.

अर्थमंत्रालयाने डॉ. मनमोहन सिंग यांची वयाच्या २५व्या दखल घेतली. डॉ. मनमोहन सिंग कमी बोलणारे व्यक्तीमत्त्व असले तरी त्यांच्या विधानांनी ते विरोधकांची बोलती बंद करायचे. असाच त्यांचा काव्यशैलीचा हटके अंदाज संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळाला होता. संसदेत सुष्मा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाल्यावर त्यावर प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक शायरी संसदेच्या अधिवेशनात सादर केली होती. त्या शायरीने खुद्द सुषमा स्वराज यांच्या चेहऱ्यावर देखील हसू दिसून येत होते.

डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेतील अधिवेशनात सादर केलेली शायरी अशी होती की, 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख'. या शायरीवर अधिवेशनातील सर्व मंडळींनी या शायरीला दाद दिली होती. तसेच त्यांचे कौतुकदेखील केले होते.