मुंबई : (Dr. Manmohan Singh's Decisions) जगविख्यात अर्थतज्ज्ञ तसेच भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात निधन झाले आहे. ते ९२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या एकंदरीत कारकिर्दही कार्यसंपन्न राहिलेली आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत विशेष परिवर्तन घडून आले.
डॉ. मनमोहन सिंग यांचे महत्त्वाचे निर्णय :
१) जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण
२) मनरेगा - गरिबांचे जीवनमान उंचावणारे रोजगार हमी देणारी योजनेचा निर्णय
३) माहितीचा अधिकार - सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांना हा माहितीचा अधिकार देण्याचा निर्णय
४) आधार - नागरिकांना देशभरात सार्वत्रिक ओळख निर्माण करुन देणारी आधार प्रणाली जी सध्याच्या घडीला खूप महत्त्वाची ठरलेली आहे.
५) शिक्षणाचा अधिकार - मुलांना निःशुल्क आणि अनिर्वाय शिक्षणासाठी कायदा करण्याचा निर्णय
६) अणु करार - अणुउर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी अमेरिकेबरोबर सहकार्याचा करार हा ऐतिहासिक निर्णय
७) वनाधिकार कायदा - आदिवासींना आणि वनवासींना वनजमिनीवर सामूहिक हक्क देणारा कायदा
८) अन्न सुरक्षा - भारतातील दोन तृतीयांश लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा
९) कर्जमाफी - शेतकऱ्यांना ६० हजार कोटींची कर्जमाफी
१०) अवकाश संशोधन- मंगळयान आणि चांद्रयान मोहिमांना गती
आधी अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेले हे निर्णय हे देशाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील.