पूंछ येथील अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू! राज्य सरकारकडून एक कोटींची मदत जाहीर
26-Dec-2024
Total Views |
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्यावर असताना एका रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या दोन्ही जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये झालेल्या अपघातात भारतीय सैन्यदलाचे ५ जवान शहीद झाले. यातील मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी या गावातील असून, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारच्या वतीने या दोघांच्या वारसांना एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.