हिंदूंविरोधात झालेल्या दंगलीत पोलिसांना पिस्तुल दाखवणाऱ्या शाहरूखला ओवेसी उमेदवारी जाहीर करणार?

    25-Dec-2024
Total Views |

AIMIM
 
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंदूंविरोधातील झालेल्या दंगलीला पाठबळ देणारे नेते ताहिर हुसेन यांच्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणखी एक आरोपी शाहरूख पठाणला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मुस्लिमबहुल सीलपूर येथून दिल्ली पोलिसांवर पिस्तुल दाखवणाऱ्या शाहरूख पठाणला एमआयएम पक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.
 
नुकतीच दिल्ली एमआयएमचे अध्यक्ष शोएब जमाई यांनी शाहरूख पठाणच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यामुळे आता आरोपी शाहरूख पठाण यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला. मात्र यावर जमईने सोमवारी २३ डिसेंबर २०२४ रोजी ट्विट करत याप्रकरणी माहिती दिली आहे.
 
 
 
त्यांनी ट्विट करत लिहिले की, "तुरूंगात असलेल्या शाहरूख पठाणच्या आईला मी त्याच्या घरी अलीकडेच भेटायला गेलो होतो. दिल्ली येथील एमआयएमच्या शिष्ठमंडळाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांची स्थिती आणि कायदेशीर मदत यावर कायदेशीर चर्चा केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेवरून त्यांच्या मुलीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला", असे ट्विट त्यांनी केले.