इस्लामी कट्टरवादापुढे इंग्लंडच्या कायद्याने टेकले गुडघे
कट्टरपंथींच्या ४ वेळा विवाह करण्याच्या पद्धतीला शरिया कोर्ट देते प्रोत्साहन
23-Dec-2024
Total Views |
लंडन : इस्लामी कट्टरवादापुढे इंग्लंडचा कायदा हा बळी पडला जात आहे. कायद्याचे राज्य ही संकल्पना देणाऱ्या देशात आता इस्लामिक न्यायालये सुरू करण्यात आली आहे. ही न्यायालये उघडपणे ब्रिटीश कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. शरिया कोर्ट नावाने चालवण्यात येणारी ही न्यायालये कट्टरपंथी समाजकंटकांच्या एकाच व्यक्तीने ४ वेळा विवाह करण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे. ब्रिटीश सरकार या न्यायालयांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. या न्यायालयांमध्ये कायदेशीर अधिकृत नोंद नसलेले कायदेशीर विवाह होत आहेत.
द टाइम्स या ब्रिटीश वृत्तपत्रानुसार, सध्या इंग्लंडमध्ये अशा ८५ शरिया न्यायालये कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुस्लिमांचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शरिया न्यायालये संपूर्ण इंग्लंडमध्ये पसरलेली आहे. ही न्यायालये विवाह, तलाक, चार वेळा निकाह यांसारख्या प्रकरणावर खुल्या पद्धतीने निर्णय देत आहेत. ही न्यायालये ब्रिटिश कायद्याविरोधात अनेक निर्णय देताना दिसत आहेत.
शरिया न्यायालय हे लंडन येथे १९८२ साली खुले करण्यात आले होते. तेव्हापासून त्यात सातत्याने वाढही होत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणात एका न्यायालयाने मुस्लिम पुरूषांना त्यांच्या पत्नीचा फोन नंबर विचारणाऱ्या एका अॅपला मंजूरी देण्यात आली होती. शिवाय याप्रकरणात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आणखी एका अॅपमध्ये मुस्लिम तरुण निकाहानंतर किती बायका करू शकतात याची माहिती त्या अॅपमध्ये नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान ब्रिटीश कायद्यानुसार, कोणतीही एक व्यक्ती एकाहून अधिक विवाह करू शकत नाही. यासंबंधित त्याचे घटस्फोट आणि त्याचे कायदेशीर आदेश आवश्यक असणे गरजेचे आहे. शरिया न्यायालयांनी सुमारे १००,००० विवाहांचे आयोजन केले आहे. जे ब्रिटीश कायद्यानुसार नोंदणीकृत नाहीत. इंग्लंडमधील शरिया न्यायालयांचा प्रभाव इतका वाढला आहे की, आता युरोप-अमेरिकेतील इतर देशांतील मुस्लिम आपले काही मुद्दे घेऊन शरिया न्यायालयात येऊ लागले आहेत. मात्र याचा गैरप्रकार उद्भवू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही.
शरिया न्यायालयाने कट्टरपंथींच्या ४ विवाहासाठी पाठिंबा देत आहे. मात्र ब्रिटिश एजन्सी आता त्यांच्यापुढे हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुस्लीम तुष्टीकरणात सतत गुंतलेल्या नेत्यांनी संबंधित प्रश्नाकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये इस्लामिक कट्टरतावादावर सरकार आणि उदारमतवादी संबंधित असणारे लोक मूग गिळून गप्प आहेत. याप्रकरणात आतापर्यंत सुमारे ५ लाख युवती बळी ठरल्या आहेत. या टोळीचे सुत्रधार हे पाकिस्तानी आहेत. ते युवतंचे लैंगिक शोषण करतात. पोलिसही याप्रकरणात फारसा हस्तक्षेप करत नाहीत.